संगणकाचे फायदे | ADVANTAGES OF COMPUTER IN MARATHI

संदर्भ

संगणकाचे फायदे या विषयावर खरं म्हणजे एक प्रबंध लिहिता येईल.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकाने मनुष्याचं जीवन आमूलाग्र बदलून टाकलं आहे यात शंकाच नाही संगणकाच्या सर्वच फायद्यांची नोंद करणं हे केवळ अशक्य काम आहे.

अगदी महत्त्वाच्या फायद्यांवरच आपल्याला एक ओझरता दृष्टिक्षेप करता येईल.

संगणकाचे फायदे

 • गणिती सूत्र कितीही अवघड असलं तरी संगणक ते चटकन सोडवू शकतो.
 • त्याच त्याच प्रकारचं गणन करण्यात संगणक तरबेज आहे. अशा प्रकारचे गणन शीघ्रगतीने करण्यात त्याचा हात कुणीच धरू शकणार नाही.
 • संगणकात अती प्रचंड माहिती संग्रहित करून ठेवता येते. एखादी विशिष्ट माहिती आपल्याला पाहिजे असेल, तर संगणक झटकन् ती आपल्या समोर ठेवू शकतो.
 • संगणकात निर्णय घेण्याची क्षमता आहे.
 • संगणकाचा उपयोग करून आलेख, आकृत्या, रंगीत चित्रे रेखाटता येतात. कोणत्याही क्लिष्ट यंत्राची रचना संगणकाच्या साह्याने सुलभपणे काढता येते. एवढेच काय ! निरनिराळ्या कोनातून यंत्र कसं दिसेल तेही संगणक दाखवू शकतो.
 • उद्योगधंदे, व्यापार, बँकिंग ही क्षेत्रे संगणकाने जवळ जवळ काबीज केली आहेत.
 • खगोल, अवकाश, वगैरे गुंतागुंतीच्या शास्त्रांसाठी संगणकाचा फार उपयोग होतो.
 • संशोधनक्षेत्रात संगणकासारखा दुसरा सखा शोधूनही सापडणार नाही.
 • सैन्याच्या तीनही दलांची बरीचशी भिस्त आता संगणकावरच असते.
 • वैद्यकशास्त्रात रोगाचं अचूक निदान करण्यापर्यंत संगणकाची मजल जाऊन पोहोचली आहे.
 • संगणकामुळे शिक्षकाशिवाय शिक्षण मिळण्याची सोय झाली आहे.
 • कारखान्यातील विविध यंत्रांचे नियंत्रण करण्यात संगणकाइतकी तरबेज गोष्ट दुसरी नाही.
 • थोडक्यात काय ? ज्या ज्या जीवनाच्या क्षेत्राकडे पहावं त्या त्या क्षेत्रात संगणकाने ठाण मांडल आहे.

हे सुद्धा वाचा –