अल्गोरिदम म्हणजे काय मराठी मध्ये | ALGORITHM IN MARATHI

अल्गोरिदम म्हणजे काय मराठी मध्ये | ALGORITHM IN MARATHI – अल्गोरिदम या शब्दाचा अर्थ आहे नियम, तंत्र किंवा कार्यप्रणाली !

ज्या क्रमाने गेल्यास एखाद्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळते, तो क्रम, म्हणजेच अल्गोरिदम ! प्रत्यक्ष प्रोग्रॅम लिहिण्याच्या आधी अल्गोरिदम निश्चित केला तर प्रोग्रॅम लिहिण्याचं काम अत्यंत सोपं होतं.

अल्गोरिदम चे नियम | RULES OF ALGORITHM IN MARATHI

मात्र आलगोरिथम लिहिताना काही नियम पाळावे लागतात.पहिला नियम असा की, आकडेमोड कितीही लांबलचक किंवा किचकट असली तरी अल्गोरिदम मर्यादित पदांनंतर संपलाच पाहिजे.

दिलेल्या प्रश्नामधील सर्व पर्यायांचा अल्गोरिदममध्ये विचार झाला पाहिजे, हा दुसरा नियम, आणि एकच अल्गोरिदम विशिष्ट प्रकारच्या आकडेमोडीसाठी उपयोगी पडला पाहिजे, हा तिसरा नियम.

कामीतकमी पदांनंतर अल्गोरिदम समाप्त होणे हा त्याची कार्यक्षमता ठरविण्याचा एक निकष मानला जातो.

अल्गोरिदम चे उदाहरण | EXAMPLE OF AN ALGORITHM IN MARATHI

नेहमीच्या व्यवहारातही आपण नकळतपणे अल्गोरिदमचा वापर करीत असतो. समजा एखाद्या व्यक्तिला ‘बेसिक ही संगणकाची भाषा शिकायची आहे, तर त्यासाठी अल्गोरिदम कसा लिहिता येईल पहा !

 • बेसिक भाषा शिकायची आहे अशी इच्छाशक्ती.
 • बेसिक भाषोवरील पुस्तकांची जमवाजमव.
 • भाषा जेथे शिकविण्यात येते अशा वर्गात प्रवेश.
 • प्रोग्रॅम लिहिण्याचा अभ्यास.
 • लिहिलेल्या प्रोग्रॅम्सची प्रत्यक्ष संगणकावर अंमलबजावणी.
 • नवीन प्रश्नांचे स्वतः संकल्पन करून त्यांचे बेसिक प्रोग्रॅम लिहिणे.

हे झाले एक व्यवहारिक उदाहरण ! आता गणितातील एका साध्या सूत्रासाठी कसा अल्गोरिदम लिहिता येईल पहा !

समजा दिलेले सूत्र m + n x = r असं आहे. त्यामधील x या आज्ञात संख्येची किंमत निश्चित करायची आहे. त्यामुळे हेच सूत्र

x = (r-m)/n असे लिहिता येईल.

 • जर n = 0 आणि m = r असेल तर पद क्रमांक ६ कडे जा.
 • जर n = 0 आणि m = r असेल तर पद क्रमांक ५ कडे जा.
 • मधून m वजाकरा आणि यावजाबाकीला ‘७’ असे नाव द्या. (b =r- m)
 • b या संख्येला n या संख्येने भागा. जर बाकी शून्य आली तर b/n या भागाकाराची किंमत हीच ‘x’ या अज्ञात संख्येची किंमत आहे. असे छापा आणि पद क्रमांक ७ कडे जा.
 • ‘कोणताही पूर्णांक हे सूत्र समाधानकारकपणे सोडवू शकत नाही असे छापा आणि पद क्रमांक ७ कडे जा.
 • ‘कोणताही पूर्णांक हे सूत्र समाधानकारकपणे सोडवू शकतो’ असे छापा.
 • थांबा.

हे सुद्धा वाचा