असेंब्ली लँग्वेज / असेम्बली भाषा म्हणजे काय मराठी मध्ये | ASSEMBLY LANGUAGE IN MARATHI

असेंब्ली लँग्वेज

असेंब्ली लँग्वेज / असेम्बली भाषा म्हणजे काय मराठी मध्ये | ASSEMBLY LANGUAGE IN MARATHI – मशीन लँग्वेजमध्ये प्रोग्रॅम लिहिणं फारच कठीण आहे, हे लक्षात आल्यावर, त्यावरील उतारा म्हणून अॅसेंब्ली लँग्वेज निर्माण करण्यात आली.

त्यामध्ये प्रत्येक सूचना एक आणि शून्य या आकड्यांऐवजी शद्वात लिहिण्याची सोय होती.

हे शब्द सुद्धा असे निवडण्यात आले की पाहिजे तो विशिष्ट अर्थ त्यातून निघावा.

उदाहरणार्थ बेरजेसाठी ‘अॅड’, गुणाकारासाठी ‘मल्’ (मल्टिप्लाय मधील पहिले दोन शब्द), वजाबाकी साठी ‘सब्’ (सब्ट्रॅक्ट मधील पहिले दोन शब्द), असे अनेक सहज लक्षात येणारे शब्द अॅसेंब्ली भाषेत वापरले जातात.

अर्थातच अॅसेंब्ली भाषेत लिहिलेला प्रोग्रॅम मशीन लैंग्वेजमध्ये रूपांतरित करण्याची सोय हवीच ! नाही तर संगणकाला या भाषेत लिहिलेला प्रोग्रॅम समजण्याची शक्यताच नाही.

त्याला मशीन लँग्वेज शिवाय दुसरं काहीही समजत नाही. अँसेंब्ली भाषेतील प्रोग्रॅमचं मशीन भाषेत भाषांतर करणाऱ्या साधनाला अँसेंब्लर असं नाव आहे.

अॅसेंब्ली भाषा मध्ये अॅड्रेस म्हणजे काय | ADDRESS IN ASSEMBLY LANGUAGE

अँसेंब्ली भाषेमध्ये प्रत्येक सूचनेसाठी मेमेरीमधील एक किंवा अनेक जागा राखून ठेवल्या जाता आणि त्या जागांसाठी क्रमांकही मिळतात त्यांनाच ‘अॅड्रेस’ असे नाव आहे.

मोठ्या शहरात घरांना क्रमांक असतात ना!

त्यातलाच हा प्रकार आहे. अशा प्रकारे एकदा पहिल्या सूचनेला क्रमांक मिळाला की पुढील सूचनांना आपोआप पुढचे क्रमांक मिळत जातात, ते प्रोग्रॅम करणाऱ्याला लिहावे लागत नाहीत.

तसेच दिलेला डाटा दशमान पद्धतीत किंवा शद्वात लिहिला तरी चालतो. या सर्व गोष्टींमुळे प्रोग्रॅम लिहिणाऱ्याचं काम फारच सुलभ होतं.

अॅसेंब्ली लँग्वेज / असेम्बली भाषा मध्ये अॅड्रेस म्हणजे काय अॅसेंब्लर म्हणजे काय | ASSEMBLER IN ASSEMBLY LANGUAGE

अॅसेंब्ली भाषेत लिहिलेला सोर्स प्रोग्रॅम आणि मशीन लँग्वेजमध्ये रूपांतरित झालेला ऑब्जेक्ट प्रोग्रॅम एकाच वेळी पहाता येतात. असेंब्लरचं हे एक वैशिष्ट्य आहे.

त्यामुळेच प्रोग्रॅममधील चुकांची दुरुस्ती आणि त्यामध्ये सुधारणा करणं सोपं जातं.

या शिवाय अॅसेंब्लर प्रोग्रॅममध्ये कोणत्या चुका झाल्या आहेत हे दाखवू शकतो.

आधी लिहिलेले प्रोग्रॅम नवीन प्रोग्रॅममध्ये वापरण्याची सोय, किंवा ते एकमेकाला पाहिजेत तसे सांधण्याची व्यवस्था हे असेंब्ली भाषेचे आणखी काही विशेष आहेत.

असेंब्ली लँग्वेज / असेम्बली भाषा चे तोटे | LIMITATIONS OF ASSEMBLY LANGUAGE IN MARATHI

इतक्या सर्व जमेच्या बाजू असूनही अॅसेंब्ली भाषेला उच्च पातळीच्या भाषेचा दर्जा-दिला जात नाही. त्याचं पहिलं कारण असं, की सर्व प्रकारच्या संगणकांसाठी ती प्रमाणित करणे अशक्य आहे.

मायक्रोप्रोसेसर हा जो संगणकाचा महत्त्वाचा घटक असतो, त्यानुसार ही भाषा बदलते.

६५०२‘ या मायक्रोप्रोसेसरची भाषा ‘८०८६‘ किंवा ‘झेड् ८०‘ या प्रोसेसर्सना चालत नाही.

याचा अर्थ असा की प्रत्येक प्रोसेसर्ससाठी नव्याने असेंब्ली भाषा शिकावी लागते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की अॅसेंब्ली भाषेत प्रोग्रॅम लिहायचा तर गेला बाजार १५० ते २०० सूचनाची लघुरूपांतरे लक्षात ठेवायला हवीत.

म्हणजेच मूळ मायक्रोप्रोसेर्सचं कार्य कसं चालतं, हे माहीत नसेल तर असेंब्ली भाषेत प्रोग्रॅम लिहिता येणार नाही.

अर्थातच संगणकाची अंतर्गत माहिती नसलेली व्यक्ति अॅसेंब्ली भाषेत प्रोग्रॅम लिहू शकत नाही.

त्यामुळेच ही भाषा लोकप्रिय झाली नाही, आणि अखेरिला. उच्च पातळीच्या भाषा निर्माण करणं एवढाच मार्ग शिल्लक राहिला.

तरीही मायक्रोप्रोसेसवर आधारित असलेल्या साधनांसाठी असली भाषोतच प्रोग्रॅम लिहावे लागतात.

ही साधने म्हणजे लहान स्वरूपातील संगणकच असतात. विशेषतः मोठ्या कारखान्यांमध्ये त्यांचा फारच उपयोग होतो.

हे सुद्धा वाचा