‘सी’ प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | ‘C’ PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI

‘सी’ लँग्वेज म्हणजे काय | ‘C’ LANGUAGE IN MARATHI

‘सी’ प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | ‘C’ PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI – स्टार वॉर चित्रपटाबरोबर अवकाशाच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटांचं एक नवीन युग सुरू झालं.

अंतराळातील अनेक घटना हुबेहूब दिसाव्यात म्हणून त्यात कित्येक ‘स्पेशल इफेक्टस्’ निर्माण करण्यात आले होते.

त्यानंतर आलेल्या ‘स्टार ट्रेक-२’ आणि ‘रिटर्न ऑफ जेडी’ या चित्रपटात तर अशा स्पेशल इफेक्टसूची रेलचेल होती.

त्या सर्व अद्भुत् आभासांची निर्मिती संगणकाद्वारे एका भाषेच्या माध्यमातून करण्यात आली होती, हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. या भाषेचं नाव आहे ‘सी’.

नाव जरा विचित्र आहे, पण संगणकतज्ज्ञ सध्या तिचा हिरीरीने पुरस्कार करीत आहेत.

‘सी’ प्रोग्रॅमिंग लँग्वेज चा इतिहास | HISTORY OF ‘C’ LANGUAGE IN MARATHI

अमेरिकेतील बेल प्रयोगशाळेत डेनिस रिची यांनी १९७२ साली ‘सी’ या भाषेचा पाया घातला.

ही भाषा ‘युनिक्स’ नावाच्या ऑपरेटिंग सिस्टिमचे प्रोग्रॅम लिहिण्यासाठी प्रथम वापरण्यात आली, पण आता जवळ जवळ सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टिमचे प्रोग्रॅम ‘सी’ मध्येच लिहिले जातात, इतकं तिचं महात्म्य वाढलं आहे.

‘विश्वसनीय, नियमित, साधी आणि वापरायला सोपी’ असं ‘सी’ चं वर्णन करण्यात येतं, परंतु नवख्या माणसाला ती बरीच अवघड वाटेल.

संगणकाच्या भाषा नव्यानेच शिकणाऱ्यांनी ताबडतोब तिच्याकडे न वळलेलं बरं!

‘सी’ प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे फायदे | ADVANTAGES OF ‘C’ LANGUAGE IN MARATHI

पास्कल प्रमाणेच ‘सी’ ही सूत्रबद्ध भाषा आहे. तिच्यामधील सर्व सूचना मुद्देसूद आणि अतिशय छोट्या असतात.

‘सी’ च्या अंतर्गत असलेल्या छोट्या छोट्या घटक प्रोग्रॅमच्या आधाराने, अतिशय गुंतागुंतीचे प्रोग्रॅम सहजपणे लिहिता येतात.

या भाषेत लिहिलेल्या प्रोग्रॅमसाठी मेमरीमधील फार थोडी जागा लागते आणि संगणकाला ते अतिशय त्वरेने कार्यवाहित आणता येतात.

‘सी’ मुळे संगणकाच्या सर्व कार्यक्षमतेचा सुयोग्य उपयोग करता येतो.

‘सी’ लँग्वेजची वैशिष्ट्ये | FEATURES OF ‘C’ LANGUAGE IN MARATHI

अनेक वेळा ‘सी’ या भाषेला मध्यम पातळीची भाषा असं संबोधण्यात येतं. उच्च पातळीच्या बेसिक, फोनसारख्या भाषा आणि नीच पातळीच्या मशीन आणि अॅसेंब्ली भाषा यांच्या मधली ही पातळी आहे.

याचा अर्थ असा नव्हे, की ‘सी’, उच्च पाळीच्या भाषांची बरोबरी करू शकत नाही. तिच्यामध्ये कोणताही प्रोग्रॅम लिहिता येतो. फक्त ती नीच पातळीच्या भाषांना जास्त जवळची आहे एवढंच !

नीच पातळी याचा अर्थ खालच्या दर्जाची, असा व्यावहारिक अर्थ इथे अभिप्रेत नाही. उलट जितकी भाषा नीच पातळीची तेवढी ती संगणकाला जास्त जवळची.

या भाषांतून लिहिलेले प्रोग्रॅम संगणकाला लवकर समजतात आणि म्हणूनच त्यांच्या कार्यवाहीला फार अल्प वेळ लागतो. ‘सी’ ला संगणकाच्या विशिष्ट गुणधर्माचा फायदा मिळतो.

परंतु सध्या तरी ऑपरेटिंग सिस्टिममधील प्रोग्रॅम लिहिण्यासाठीच ‘सी’ चा जास्त उपयोग केला जातो.

हे सुद्धा वाचा