कमांड लैंग्वेज म्हणजे काय मराठी मध्ये | COMMAND LANGUAGE IN MARATHI

कमांड लैंग्वेज म्हणजे काय मराठी मध्ये | COMMAND LANGUAGE IN MARATHI

कमांड लैंग्वेज म्हणजे काय मराठी मध्ये | COMMAND LANGUAGE IN MARATHI- बेसिक, कोबोल वगैरे उच्च पातळीच्या भाषांप्रमाणे कमांड लँग्वेज ही काही स्वतंत्र भाषा नाही.

ऑपरेटिंग सिस्टिमचाच हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तिच्यामध्ये केवळ काही आज्ञांचाच समावेश असल्यामुळे तिला कमांड लँग्वेज म्हणतात.

प्रत्यक्ष प्रोग्रॅम लिहिण्यासाठी तिचा उपयोग करता येत नाही. परंतु संगणक वापरताना काही विशिष्ट गोष्टी कराव्या लागतात, त्यासाठी वापरणारा आणि ऑपरेटिंग सिस्टिम यांचेमध्ये सरळ संबंध यावा लागतो.

तो कमांड लँग्वेज मार्फत साध्य करता येतो.

कमांड लैंग्वेज मधील कमांड / आज्ञा

कमांड लँग्वेजमधील काही महत्त्वाच्या आज्ञा कशा आहेत पहा ! बाजारात मिळणारी फ्लॉपी डिस्क कोरी असते. तिच्यावर ट्रॅक्स आणि सेक्टर पाडलेले नसतात.

फ्लॉपीचा माहिती संग्रहित करण्यासाठी उपयोग करण्याआधी, तिच्यावर प्रथम ट्रॅक्स आणि सेक्टर पाडणे आवश्यक असते. या क्रियेसाठी फॉर्मॅट नावाची एक आज्ञा आहे.

एका फ्लॉपीवर संग्रहित केलेली माहिती दुसऱ्या फ्लॉपीवर उतरवून घेण्यासाठी ‘कॉपी’ नावाची आज्ञा वापरतात. फ्लॉपीवरील विशिष्ट माहिती किंवा सर्वच्या सर्व माहिती पुसून टाकण्यासाठी ‘इरेज’ किंवा ‘डिलिट’ अशी आज्ञा दिली जाते.

फ्लॉपीवर कोण कोणत्या फाइल्स आहेत ते पहाण्यासाठी ‘डिरेक्टरी’ या इंग्रजी शब्दाचे लघुरूप आज्ञा म्हणून वापरता येते.

कमांड लैंग्वेज चा उपयोग

या शिवाय, संगणक वापरणाऱ्याची ओळख, संगणकाचा किती वेळ वापरला त्याची माहिती, प्रोग्रॅम कोणत्या भाषेत लिहिलेला आहे, कोणते सॉफ्टवेअर आणि फाइल्स वापरल्या आहेत, त्यांची ओळख, कोणत्या प्रकारचे आउटपुट साधन वापरायचे आहे, किती प्रती पाहिजेत, एका ओळीत किती अक्षरे हवीत ८० की १३२, अशा अन्य अनेक कामांसाठी कमांड लँग्वेजचाच उपयोग केला जातो.

हे सुद्धा वाचा