प्रोग्रॅम म्हणजे काय | WHAT IS COMPUTER PROGRAM IN MARATHI

प्रोग्रॅम म्हणजे काय

संगणक प्रोग्रॅम म्हणजे काय ? संगणक म्हणजे आकडेमोड करणारं एक यंत्र ! अशी सामान्यपणे भावना असते. परंतु जलदगतीने गणितं करणारं साधन, एवढ्याच पुरतं संगणकाचं कार्य मर्यादित नाही. त्यापेक्षा अनेक गोष्टी करण्याची त्याची क्षमता असते.

निवड, नक्कल, तुलना, रिझर्वेशन, वगैरे गणिताशी संबंध नसलेली अनेक कामे त्याच तत्परतेने संगणक करू शकतो.

परंतु विविध प्रकारची कामं संगणकाकडून साध्य करून घ्यायची असतील तर त्याला कामाचा एक आराखडा काढून द्यावा लागतो. त्या आराखडयाबरहुकूम संगणक पावले टाकतो.

संगणकाच्या कामाचा आराखडा म्हणजेच प्रोग्रॅम !

संगणकामधील प्रोग्रॅम

युद्ध सुरू झालं की आघाडीवर लढणाऱ्या सेनापतीला सरसेनापतीकडून अगदी तपशीलवार सूचना दिल्या जातात. त्याला सांगितलेलं अंतिम लक्ष्य साध्य करण्यासाठी, त्याने एका मागून एक काय काय करायचं, याची ती जंत्रीच असते.

संगणकाचं ही असंच आहे. आपल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळण्यासाठी कशा पद्धतीने काम करायचं हे संगणकाला विस्तृत सूचना देऊन सांगावं लागतं.

या सूचना अर्थातच मानव निर्मित असतात. अशा तपशीलवार सूचनांची जंत्री म्हणजेच प्रोग्रॅम ! अर्थातच त्या नुसत्या कागदावर लिहून भागत नाही.

संगणकाला समजू शकेल अशा उच्च पातळीच्या भाषेत त्या शब्दबद्ध करून, की-बोर्डच्या द्वारे संगणकात संग्रहित कराव्या लागतात.

त्यानंतर संगणकाकडे डाटा म्हणजेच माहिती पाठविली की, आपल्याला पाहिजेत तशी उत्तरं त्याच्याकडून मिळू लागतात.


हे सुद्धा वाचा –