कंप्यूटर सिमुलेशन म्हणजे काय | WHAT IS A COMPUTER SIMULATION IN MARATHI

कंप्यूटर सिमुलेशन म्हणजे काय | WHAT IS COMPUTER SIMULATION IN MARATHI

कंप्यूटर सिमुलेशन म्हणजे काय | WHAT IS COMPUTER SIMULATION IN MARATHI – अशी कल्पना करा की तुम्ही एका मोठ्या जहाजाचे कप्तान आहात.

समुद्रात तुफान वादळानं थैमान घातलं आहे, सर्व बाजूंनी लाटांचं तांडव चालू आहे, आणि तुमचं जहाज झुकांडया खात आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही अशा विपरीत परिस्थितीला कसं तोंड दयाल?

खरं म्हणजे अशी परिस्थिती केव्हातरी निर्माण होते, पण संगणकाच्या साह्याने असा देखावा हुबेहूब निर्माण करता येतो. अशा बिकट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा याच्या सूचनाही संगणक तुम्हाला देऊ शकतो.

हे झालं कॉम्प्यूटर सिम्युलेशनचं एक उदाहरण ! सिम्युलेशन म्हणजे व्यवहारात घडणाऱ्या एखाद्या परिस्थितीचं हुबेहूब चित्रण किंवा प्रतिकृती !

एखाद्या यंत्राचं संचालन कशा प्रकारे करायचं याचा अभ्यास करण्यासाठीही सिम्युलेशनचा उपयोग होतो. अनेक संगणकखेळांमध्ये विमानाच्या किंवा कारच्या अंतर्भागाची प्रतिकृती दाखविलेली असते, हा सिम्युलेनचाच प्रकार आहे.

संगणकामध्ये उच्च दर्जाची आकृती रेखाटण्याची आणि त्यामध्ये रंग भरण्याची क्षमता असते, त्याचाच सिम्युलेशनसाठी उपयोग करून घेतात.

कंप्यूटर सिमुलेशनचे फायदे | ADVANTAGES OF COMPUTER SIMULATION IN MARATHI

अलिकडे खऱ्याखुऱ्या विमानाचा, लढाऊ जहाजाचा किंवा रणगाड्याचा केवळ शिक्षणासाठी उपयोग करणं हे अतिशय खर्चिक काम आहे.

त्यासाठी एका शिकाऊ व्यक्तीवर लक्षावधी रूपये खर्च करावे लागतात आणि श्रीमंत देशांनाही ते परवडत नाही. या ठिकाणी कॉम्प्युटर सिम्युलेशनचा फारच उपयोग होतो.

केवळ शिक्षणासाठी हुबेहूब प्रतिकृती वापरणं, आणि त्यावरून व्यवहारात निर्माण होणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांना कसं तोंड द्यायचं हे शिकणं हे सोईचं तर आहेच, पण अल्पखर्चाचंही आहे.

संगणकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कुठल्याही वाहनाची किंवा यंत्राची अगदी हुबेहुब प्रतिकृती निर्माण करता येते. आणि त्या वाहनावर कशा प्रकारचे प्रसंग ओढवतील याचाही अभ्यास करता येतो.

कंप्यूटर सिमुलेशनचे उदाहरण | EXAMPLE OF COMPUTER SIMULATION IN MARATHI

एखाद्या शिकाऊ पायलटला लढाऊ विमानाचं शिक्षण द्यायचं आहे, अशी कल्पना करा. या विशिष्ट शिक्षणासाठी संगणकाने विमानाच्या कार्याची हुबेहूब नक्कल करायला हवी.

निरनिराळ्या उंचीवर, निरनिराळ्या वेगाने धावताना, इंधन कमी जास्त असताना, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे धारण केल्यावर, किंवा सुसाट वादळामध्ये, विमानाची हालचाल कशी करायची ?

जमिनीवर उतरत असताना विमानतळ व आजूबाजूचा प्रदेश आकाशातून कसा दिसेल? खुद्द कॉकपिटमध्ये नियंत्रकांची काय काय हालचाल करावी लागते?

या आणि अशा सर्व गोष्टींच्या प्रतिकृती संगणक निर्माण करू शकतो. अशा प्रकारे लढाऊ विमानाचा पायलट आकाशापेक्षा जमिनीवरच आपले बहुतांश शिक्षण पूर्ण करतो.

कंप्यूटर सिमुलेशनचा उपयोग | USE OF COMPUTER SIMULATION IN MARATHI

सिम्युलेशन तंत्राचा उपयोग करून, शहरातील रस्त्यांची रचना, नगररचना, विमाने, मोटर कार्स, हेलिकॉप्टर वगैरे अत्याधुनिक यंत्रांचे आराखडे तयार करता येतात.

त्यांच्यामध्ये जास्त अचूकता येण्यासाठी प्रत्यक्ष यंत्र तयार करण्याआधी त्याच्यावर सर्व प्रकारच्या चाचण्या घेता येतात. विशिष्ट परिस्थितीत ते यंत्र बरोबर काम देऊ शकेल की नाही, हे सुद्धा ताडून पहाता येतं.

एखादी घटना घडत असताना त्याची सहस्त्रावधी चित्रे संगणक अगदी अल्पवेळात तयार करू शकतो. त्यामुळे आधी घडणाऱ्या घटनांचा पुढे काय परिणाम होईल त्याचा शोध घेता येतो.

केवळ यंत्रशास्त्रातच कॉम्प्यूटर सिम्युलेशनवा उपयोग आहे असं नाही. वैद्यक, समाजशास्त्र, जीवशास्त्र, रसायन, शिक्षण मानसशास्त्र, व्यापार, पदार्थविज्ञान, तंज्ञविज्ञान या सर्व क्षेत्रात कॉम्प्यूटर सिम्युलेशनचं तंत्र वापरून संशोधन करता येतं.

हे सुद्धा वाचा