डाटा प्रोसेसिंग / डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय | DATA PROCESSING IN MARATHI

परिचय

डाटा प्रोसेसिंग / डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय | DATA PROCESSING IN MARATHI – डाटा प्रोसेसिंग म्हणजे माहिती संस्कारित करण्याची क्रिया ! या विसाव्या शतकात माहितीचा जणूकाही स्फोट झालेला आहे.

निरनिराळ्या साधनांच्या साह्याने असंख्य प्रकारच्या माहितीमध्ये सातत्याने भर पडत आहे. मानवाच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जीवनातील विविध गोष्टींची जेवढी माहिती मिळाली असेल, त्याच्या कित्येक पट माहिती काही दिवसात सध्या जमा होऊ शकते.

खगोलशास्त्र हा विषय घेतला तर व्हॉयेजरयानांनी मंगळ, गुरू, शनी वगैरे ग्रहांची जेवढी माहिती पृथ्वीवर पाठविली, तेवढी गेल्या शेकडो वर्षात मिळाली नव्हती.

नुसती माहिती एकत्र करून काम भागत नाही. तिच्यावर योग्य संस्कार करून ती सुसंगतपणे लावण्यासाठी तीन प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात. प्रथमतः मिळेल त्या साधनांनी विशिष्ट प्रकारची माहिती जमा करावी लागते.

अर्थातच ती निरनिराळ्या माध्यमातून मिळत असल्यामुळे सुसंगत नसते. त्यामुळे या मिळालेल्या माहितीवर संस्कार करावे लागतात. त्यामधूनच योग्य निष्कर्ष मिळू शकतात.

सरते शेवटी मिळालेल्या निष्कर्षांचे व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते.

डाटा प्रोसेसिंग / डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय | DATA PROCESSING IN MARATHI

माहिती जमा करताना ती योग्य आहे की नाही? तिच्यामध्ये अचूकता कितपत आहे? या गोष्टींचा विचार केल्यानंतरच तिच्यावर संस्कार करणं इष्ट असतं.

पुष्कळ वेळा माहिती गोळा करताना ती कागदावरच लिहावी लागते. त्यानंतर ती कशा प्रकारे संगणकात भरायची याचा विचार करावा लागतो.

ती एका विशिष्ट प्रकारानेच संगणकात संग्रहित केली की चटकन् हाताळता येते.

प्रभावी डेटा प्रोसेसिंगसाठी क्रिया

माहिती मिळवून ती संगणकात संग्रहित झाली की तिच्यवर संस्कर करण्याचं काम सुरू होतं. त्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्यातील काही महत्त्वाच्या क्रिया अशा :

  • मिळालेल्या माहितीची गटवार विभागणी. उदाहरणार्थ लोकसंख्येच्या माहितीचे, स्त्री, पुरुष, उद्योगधंदा, वय, शिक्षण, अशा प्रकारचे अनेक ग पडता येतील.
  • अनुक्रमाने माहितीची संगतवार मांडणी. या मध्ये उतरता किंवा चढता क्रम, जुने किंवा नवीन, लहान, मोठे, अशा अनेक प्रकारांनी माहितीची मांडणी करता येते.
  • माहितीवर गणिती प्रक्रिया पगारपत्रक, निकालपत्रक, वगैरे अनेक क्षेत्रात माहितीचा गणिती सूत्रात उपयोग करावा लागतो.
  • सरतेशेवटी, मिळालेल्या निष्कर्षांच्या सारांश किंवा संक्षेप. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट परीक्षेत पास-नापासांचे प्रमाण, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्यांची संख्या, अशा प्रकारचे संक्षेपित निष्कर्ष काढता येतात.

माहितीवर संस्कार होऊनं त्यातून निष्कर्ष मिळाले की त्या माहितीचे व्यवस्थापान हा भाग शिल्लक रहातो. अनेक वेळा विशिष्ट माहिती पुन्हा पुन्हा वापरावी लागते.

त्यासाठी ती कायमची संग्रहित करून ठेवणं आवश्यक ठरतं. फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क किंवा मॅग्नॅटिक टेप अशा माध्यमांच्या द्वारे माहितीचा संग्रह करता येतो.

पाहिजे त्यावेळी ती पुन्हा आपल्याला पहायला मिळते. बरेच वेळा एका ठिकाणी संस्कारित केलेली माहिती, दुसऱ्या जागी पुढील संस्कारासाठी किंवा उपयोगासाठी पाठवावी लागते.

तसेच तिच्या प्रती तयार करून त्या ठिकठिकाणी पाठवाव्या लागतात. डाटा प्रोसेसिंगमध्ये याही गोष्टींचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा