इंटरप्रीटर आणि कंपाईलर यामध्ये काय फरक आहे | DIFFERENCE BETWEEN INTERPRETER AND COMPILER IN MARATHI

परिचय

इंटरप्रीटर आणि कंपाईलर यामध्ये काय फरक आहे | DIFFERENCE BETWEEN INTERPRETER AND COMPILER IN MARATHI – इंटरप्रिटर आणि कंपायलर दोघेही दुभाषाचेच काम करतात, म्हणजेच उच्च पातळीच्या भाषेचे संगणकाला समजणाऱ्या मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करतात.

परंतु दोघांच्या कामाच्या पद्धतीत पुष्कळ फरक आहे. लहान संगणकात इंटरप्रिटर कायमचाच संगणकाच्या इतर विद्युत्मंडलांबरोबर बांधून ठेवलेला असतो.

कंपायलर मात्र बहुधा फ्लॉपी डिस्कवर संग्रहित करून ठेवलेला असतो. आवश्यक वाटेल त्यावेळी तो संगणकाच्या मेमरीमध्ये संग्रहित केला जातो.

इंटरप्रीटर आणि कंपाईलर यामध्ये काय फरक आहे | DIFFERENCE BETWEEN INTERPRETER AND COMPILER IN MARATHI

कंपायलरला उच्च पातळीच्या भाषेतील सोर्स प्रोग्रॅम दिला, की प्रथम त्या सर्व प्रोग्रॅमचे तो ऑब्जेक्ट प्रोग्रॅममध्ये म्हणजेच मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करतो.

इंटरप्रिटर तसं करीत नाही. तो उच्च भाषेतील प्रोग्रॅममधील प्रत्येक वाक्य म्हणजेच सूचना वाचतो आणि फक्त त्या वाक्याचेच मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करतो आणि नंतर लगेच त्या वाक्याची अंमलबजावणी ही करून टाकतो.

अशा प्रकारे इंटरप्रिटर वापरला तर सर्व प्रोग्रॅमची सूचनांप्रमाणे अंमलबजावणी चालू असतानाच, प्रत्येक ओळीचे मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर होत असते.

कंपायलर प्रमाणे इंटरप्रिटर संपूर्ण मशीन लँग्वेजमधील प्रोग्रॅम एकाच वेळी निर्माण करीत नसल्यामुळे, अर्थातच त्याला कंपायलरपेक्षा संगणकातील मेमरी फार कमी लागते.

बेसिक भाषेसाठी कंपायलरपेक्षा इंटरप्रिंटरचाच उपयोग करतात. त्यामुळेच तिला संगणकातील कमी मेमरी लागते. फोट्रान, कोबोल वगैरे भाषांचं तसं नाही.

त्यांचे मशीन लँग्वेजमधील भाषांतर कंपायलर वरच अवलंबून असतं. कंपायलर हाताळायलाही जरा कठीणच असतो. बेसिक ही भाषा लोकप्रिय असण्याचं हेही एक महत्त्वाचं कारण आहे.

इंटरप्रिंटर वापरायला सोपा असला तरी त्याचे काही तोटे आहेत. कंपायलरची गती आणि कार्यक्षमता इंटरप्रिटर पेक्षा पुष्कळच जास्त असते.

कारण कंपायलरने निर्माण केलेला ऑब्जेक्ट प्रोग्रॅम पूर्णपणे मशीन लँग्वेजमध्ये असल्यामुळे त्याची त्वरेने अंमलबजावणी होऊ शकते.

या उलट इंटरप्रिटर कोणत्याही सूचनेच्या अंमलबजावणीआधी प्रत्येक ओळीचे मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करीत बसतो. अर्थातच त्याला सर्व प्रोग्रॅमची अंमलबजावणी करायला जास्त वेळ लागतो.

एखादा बुद्धिमान विद्यार्थी गणिताची सर्व पदे मनातल्या मनात सोडवून, त्याचे उत्तर ताड्कन कागदावर मांडून मोकळा होतो, तर कमी बुद्धिमत्तेचा विद्यार्थी प्रत्येक पद सोडवित बसतो, त्यातलाच हा प्रकार आहे.

एकदा कंपायलरने ऑब्जेक्ट प्रोग्रॅम निर्माण केला की तो फ्लॉपी डिस्कवर कायमचा संग्रहित करून ठेवता येतो. त्या विशिष्ट प्रोग्रॅमसाठी मग पुन्हा पुन्हा मशीन लँग्वेजमध्ये भाषांतर करावं लागत नाही.

संगणकाला तो प्रोग्रॅम आणि नवीन डाटा दिला की क्षणार्धात त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. इंटरप्रिटरला मात्र दर वेळी प्रत्येक ओळीचं पुन्हा पुन्हा भाषांतर करावं लागतं.

इंटरप्रिटरची कार्यक्षमता आणि गती कमी असली तरी वापरायला तो अत्यंत सोईचा आहे. त्यामुळेच अलिकडे फोट्रान, कोबोल वगैरे भाषांसाठी इंटरप्रिटर उपलब्ध होऊ लागले आहेत.

हे सुद्धा वाचा