एनिऐक संगणकाची वैशिष्ट्ये | ENIAC COMPUTER – HISTORY, FEATURES, SPECIFICATIONS IN MARATHI

संदर्भएनिऐक संगणकाची वैशिष्ट्ये

एनिऐक संगणकाची वैशिष्ट्ये | ENIAC COMPUTER – HISTORY, FEATURES, SPECIFICATIONS IN MARATHI – दरम्यानच्या काळात दुसरे महायुद्ध सुरु झाले आणि सैन्याला गणिताच्या अचूक यंत्रांची नितांत गरज होती.

अंतर, अँगल, वेग या सारख्या अनेक तक्त्यांची खूप आवश्यकता होती, विशेषत: लहान आणि मोठ्या तोफा आणि मशीन गनसाठी.

त्यासाठी असंख्य सूत्रे सोडवावी लागली. १९४३ मध्ये लष्कराची दुर्दशा लक्षात घेऊन प्रेस्पर एकार्ट आणि जॉन मॉचली यांनी त्यांच्यासाठी संगणक योजना तयार केली.

अमेरिकेच्या सैन्याने तातडीने या योजनेची निवड केली आणि आवश्यकतेनुसार पैसे खर्च करण्यास सहमती दर्शविली. त्यातूनच आधुनिक संगणकाचा जन्म झाला.

१९४६ च्या युद्धाच्या समाप्तीनंतर एकर्ट आणि मौचलीचे संगणक सिद्ध झाले. त्यास ‘एनिऐक’ असे नाव देण्यात आले!

एनिऐक संगणकाचा आकार

एक्केर्ट आणि माउश्ले यांनी १९४६ साली सिद्ध केलेला इलेक्ट्रॉनिक संगणक भलताच अवाढव्य होता. एकंदर १०० फूट लांब, १० फूट उंच आणि ३ फूट रुंद असं एनिऐकच मोजमाप होतं.

अलिकडच्या संगणकांच्या तुलनेत एनिऐक, आकारने राक्षस होता असंच म्हटलं पाहिजे. त्याने १५००० चौरस फूट जमीन व्यापली होती.

अलिकडच्या व्यक्तिगत संगणकाला जेमतेम १० चौरस फूट जागा लागते.

एनिऐक संगणकामधील हार्डवेअर

एनिऐकमध्ये १८००० निर्वात नलिका, ७० हजार विद्युत्निरोधक म्हणजे रेझिस्टर्स व १० हजार कपॅसिटर्स वापरलेले होते. एनिऐकला कार्यन्वित करण्यासाठी १,४०,००० वॉट विद्युतशक्ति लागत असे.

तीस टन वजनाचा हा राक्षसी संगणक इकडून तिकडे हालविणे, हे एक मुश्किल काम होते.

एनिऐक संगणकाची संगणकीय शक्ती

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक शास्त्रीय संशोधने गुप्त ठेवण्यात आली होती, त्यात एनिऐकचा क्रमांक बराच वर होता. महत्त्वाची गोष्ट अशी, की कोणतेही गुंतागुंतीचे गणित करणे हा एनिऐकच्या हातचा मळ होता.

या उलट अॅटॅनासोफ् यांचा एबीसी संगणक फक्त अनेकवर्णी समीकरणे सोडविण्यात कुशल होता.

कोणत्याही आधीच्या संगणकापेक्षा एनिक ३०० पट जलद गतीने गणिती सूत्रे सोडवू शकत असे.

तो प्रती सेकंदाला ५००० बेरजा किंवा वजाबाक्या करू शके, पण गुणाकार करतांना त्याची गती मंद होई. प्रती सेकंदाला तो फक्त ३०० गुणाकार करी.

जवळ जवळे ९ वर्षे वापरल्यावर १९५५ साली एनिऐकला मोडित काढण्यात आले.

हे सुद्धा वाचा –