प्रथम पिढी संगणक : ENIAC संगणक | EDSAC आणि EDVAC संगणक | जॉन न्युमान यांची संगणकात क्रांती | FIRST GENERATION COMPUTER IN MARATHI

प्रथम पिढी संगणक : ENIAC संगणक | EDSAC आणि EDVAC संगणक | जॉन न्युमान यांची संगणकात क्रांती | FIRST COMPUTER GENERATION IN MARATHI

या पोस्टमध्ये ENIAC सारख्या पहिल्या पिढीतील संगणकांवरील सर्व माहिती आढळेल जी इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर आणि कॉम्प्यूटरसाठी आहे. तसेच, EDSAC आणि EDVAC संगणकांवर चर्चा.

प्रथम पिढी संगणक : ENIAC संगणक | EDSAC आणि EDVAC संगणक | जॉन न्युमान यांची संगणकात क्रांती | FIRST GENERATION COMPUTER IN MARATHI

प्रथम पिढी संगणक : ENIAC संगणक | FIRST GENERATION COMPUTER IN MARATHI
ENIAC

ENIAC सारख्या प्रचंड आकाराच्या संगणकासाठी सूचना तयार करणं हे अत्यंत किचकट व क्लिष्ट काम होतं. त्यासाठी संगणकाच्या विद्युत्मंडलांची संपूर्ण माहिती असावी लागे. आता अत्याधुनिक संगणकाच्या अंतर्भागाची माहिती असणं अवश्यक नसतं.

केवळ संगणकाच्या भाषेचं ज्ञान असलं, तर कुणीही प्रोग्रॅम लिहून तो अमलात आणू शकतो. त्या काळात मात्र एनिअंकला नवीन सूचना द्यायच्या असतील, तर तारांची नवीन विद्युत्मंडलं तयार करावी लागत.

EDSAC आणि EDVAC संगणक | FIRST GENERATION COMPUTER IN MARATHI

त्यातच एक दोन दिवसांचातरी काळ सहज फुकट जात असे. या काळात संगणकाचे कार्य स्थगित ठेवावं लागे. पुढे कामाचा बोजा इतका वाढला, की लवकरच ही स्थिती असह्य होऊ लागली.

जॉन न्युमान यांची संगणकात क्रांती

या विचित्र परिस्थितीवर मात करण्यासाठी जॉन न्युमान या गणिताच्या प्राध्यापकाने संग्रहित प्रोग्रॅमची संकल्पना मांडली.

या संकल्पनेत संगणकाला द्यायच्या सूचना व पुरावायची माहिती; म्हणजेच डाटा, संगणकामध्येच संग्रहित करण्याची व्यवस्था होती.

त्यामुळे विद्युत्मंडलामध्ये बदल न करता फक्त सूचना बदलल्या, की कोणत्याही प्रकारची सूत्रे सोडविणं शक्य होऊ लागलं.

न्यूमान यांच्या संग्रहित सूचनांच्या संकल्पनेतूनच सॉफ्टवेअरची कल्पनाही रूद झाली. सॉफ्टवेअर म्हणजे विशिष्ट कार्यासाठी लिहिलेला प्रोग्रॅमचा संच!

ENIAC आणि EDVAC संगणक

जॉन न्यूमान यांच्या सिद्धांता प्रमाणे सूचना संग्रहित करून ठेवणारा संगणक १९४९ साली इंग्लंडमध्ये व १९५० साली अमेरिकेत निर्माण करण्यात आला. त्यापैकी पहिल्याचे नाव होतं EDSAC व दुसऱ्याचे EDVAC !

EDSAC कडे त्याला दिलेल्या सूचनांचा क्रम संग्रहित करून ठेवण्याची क्षमता होती. हा सूचना क्रम आधुनिक प्रोग्रॅमच्या बरोबरीचा होता.

EDSAC व EDVAC यांच्या निर्मिती बरोबरच संगणकाच्या कातीला ख्या अर्थानं प्रारंभ झाला, असं म्हणायला हरकत नाही.

व्यापारी तत्त्वावर संगणक निर्माण करणाऱ्या कंपन्यांची भरमसाठ वाढ झाली ती या नंतरच !

निष्कर्ष

तर, ENIAC संगणक हे पहिल्या पिढीचे संगणक होते आणि आजकालच्या संगणकांइतके तेवढे उपयुक्त नव्हते, ते आकारात खूपच मोठे तसेच प्राचीन तंत्रज्ञानाचेही होते. जसे व्हॅकॅम ट्यूब.

जॉन न्युमान यांची संगणकात क्रांती | FIRST GENERATION COMPUTER IN MARATHI
VACCUM TUBE

जसजसे जग वाढत आहे तसतसे नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला गेला आहे आणि आमचे कार्य अधिक कार्य करण्याची आवश्यकताही वाढत आहे. तर संगणकही अद्ययावत होत आहेत!

हे सुद्धा वाचा –