फ्लो चार्ट म्हणजे काय | फ्लो चार्ट कसा काढतात | फ्लो चार्ट चिन्हे | FLOWCHART IN MARATHI

फ्लो चार्ट म्हणजे काय

फ्लो चार्ट म्हणजे काय | फ्लो चार्ट कसा काढतात | फ्लो चार्ट चिन्हे | FLOWCHART IN MARATHI – फ्लो चार्ट म्हणजे वाहता आलेख ! प्रोग्रॅम लिहिताना कोणत्या क्रमाने जायचे.

कोणत्या ठिकाणी निर्णय घ्यायचा, तो घेतल्यानंतर कोणती पदे टाळायची याचे चित्रमय दर्शन ! थोडक्यात सांगायचं झाल्यास आकृत्यांच्या साह्याने लिहिलेला अल्गोरिदम !

फ्लो चार्ट हाताशी असेल तर प्रोग्रॅम लिहिणं म्हणजे हातचा मळ आहे. फ्लो चार्टमध्ये विशिष्ट कामासाठी विशिष्ट प्रकारच्याच आकृत्या काढण्याची पद्धत आहे. ती अशी:

फ्लो चार्ट चिन्हे | FLOWCHART SYMBOLS

लंबवर्तुळ | START / END

आकृती

फ्लो चार्ट चिन्हे | FLOWCHART SYMBOLS

कार्य – (प्रारंभ शेवट) लंबवर्तुळ आकार फ्लोचार्टच्या सुरूवातीस आणि समाप्तीच्या निर्देशासाठी वापरला जातो.

समांतरभुज चौकोन | INPUT / OUTPUT

आकृती

फ्लो चार्ट चिन्हे | FLOWCHART SYMBOLS

कार्य – (इन्पुट/आउटपुट) समांतरभुज आकार फ्लोचार्टमधील इनपुट / आउटपुट दर्शविण्यासाठी वापरला जातो.

पतंगाकृती | DECISION

आकृती

फ्लो चार्ट चिन्हे | FLOWCHART SYMBOLS

कार्य – (निर्णय) पतंगाकृती आकाराचा वापर फ्लोचार्टमधील निर्णयासाठी सूचित करण्यासाठी केला जातो.

काटकोन चौकोन | PROCESS

आकृती

फ्लो चार्ट चिन्हे | FLOWCHART SYMBOLS

कार्य – (प्रक्रिया) काटकोन आकार फ्लोचार्टमधील प्रक्रियेच्या दर्शनासाठी वापरला जातो.

लहान वर्तुळ | CONNECTOR

आकृती

फ्लो चार्ट चिन्हे | FLOWCHART SYMBOLS

कार्य – (सांधा) फ्लोचार्टमधील कनेक्टरसाठी लहान वर्तुळ आकारचा वापर केला जातो.

फ्लो चार्ट उदाहरण

पहिल्या शंभर आकड्यांची बेरीज करायची असेल तर फ्लो चार्ट कसा असेल पहा!

फ्लो चार्ट म्हणजे काय, फ्लो चार्ट कसा काढतात, फ्लो चार्ट उदाहरण

या फ्लो चार्ट मध्ये आपण ‘गणक = गणक + १’ असं विधान केलं आहे. गणिताच्या दृष्टीने ते चुकीचे आहे, असं तुम्हाला वाटेल; पण संगणकाच्या दृष्टीने ते बरोबर आहे.

या समीकरणाचा अर्थ असा की, गणकाची किंमत एकने वाढवा. जो नियम वरील समीकरणासाठी तोच बेरीज=बेरीज+गणक’ या साठीही आहे.

नवीन बेरीज बरोबर मूळ बेरीज अधिक गणक असा त्याचा अर्थ होतो.

हे सुद्धा वाचा