फोट्रॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | FORTRAN PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI

फोट्रॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय

फोट्रॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | FORTRAN PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI – संगणकासाठी निर्माण झालेल्या उच्च पातळीच्या भाषेमध्ये फोट्रन ही आद्य भाषा आहे. सर्वात जुनी पण अजुनही तितकीच उपयोगी, असे या भाषेचे वर्णन करता येईल.

‘फॉर्म्युला ट्रान्सलेटर’ या शब्दांचे लघुरूपांतर म्हणजे फोर्ट्रान ! या भाषेच्या नावावरूनच तिचा गणिती सूत्रांशी निकटचा संबंध असल्याचे तात्काळ लक्षात येते.

संगणकासाठी गणिती सूत्रांचे सहजपणे रूपांतर करणारी भाषा अशी फोट्रॉनची व्याख्या होऊ शकेल.

फोट्रॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज | WHAT IS FORTRAN IN MARATHI

गुंतागुंतीची गणिती सूत्रे सोडविणे, हे विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांमध्ये एक नेहमीचेच काम असतं. अशी सूत्रे हाताने किंवा लॉगटेबलच्या साह्याने सोडवित बसणं म्हणजे वेळेचा अपव्यय !

अर्थात पूर्वी त्या शिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. पुढे कॅलक्युलेटर आले. त्यामुळे सूत्रे सोडविण्याचं काम पुष्कळच सुलभ झालं; पण कॅल्क्युलेटरवर सुद्धा काही मर्यादा असतात.

त्यामुळे किचकट गणिती सूत्रांसाठी संगणकाचा अवलंब करण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठीच १९५४ साली बाकस नावाच्या शास्त्रज्ञाच्या आधिपत्याखाली आयबीएम् या प्रख्यात कंपनीने एक समिती नियुक्त केली.

संगणकाच्या साह्याने गुंतागुंतीची गणिती सूत्रे सोडवू शकणारी भाषा निर्माण करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली.

तीन वर्षांच्या संशोधनानंतर सदरहू समितीने १९५७ साली फोट्रॉन ही पहिली उच्च दर्जाची भाषा प्रसिद्ध केली.

फोट्रॉनचे प्रकार | VERSIONS OF FORTRAN IN MARATHI

ज्या भाषेत सातत्याने सुधारणा होत राहतात, तीच भाषा जिवंत राहते. तशा त्या फोट्र्नमध्येही होत गेल्या. १९५८ साली. ‘फोट्रॉन-२’ असे तिचे नामकरण झाले.

१९६० साली व्यापारी गणिते करता येतील, अशा सुधारणा फोट्रॉनमध्ये करण्यात आल्या आणि १९६२ साली ती ‘फोट्रॉन – ४’ या नावाने ओळखण्यात येऊ लागली.

नेहमीप्रमाणेच संगणकाच्या उत्पादकांनी आपल्या सोईप्रमाणे मूळ फोट्रॉनमध्ये बदल केले. त्यामुळे फोट्रॉन प्रमाणित करण्याची गरज निर्माण झाली.

या प्रमाणित प्रतीमध्येही वेळोवेळी भर पडतच होती. सरते शेवटी अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट या संस्थेने १९७८ साली, फोट्रॉनची सर्वात आधुनिक आणि प्रमाणित प्रत ‘ फोट्रॉन-७७’ या नावाने प्रसिद्ध केली.

सध्या फोट्रॉन-७७ हीच प्रचलित फोट्रॉन भाषा आहे.

फोट्रॉनची वैशिष्ट्ये | FEATURES OF FORTRAN IN MARATHI

फोट्रॉनसाठी कंपायलरची आवश्यकता असते.

गणिती सूत्रे जलद सोडविण्यात फोट्रॉनचा हातखंडा आहे. छोट्या व्यापारउद्योगधंद्यांसाठी तिचा उपयोग होत असला तरी संशोधन आणि तंत्रशास्त्र हेच तिचे खास क्षेत्र राहिले आहे.

संगणकासाठी क्रमाने लिहिलेल्या सूचना, असे फोट्रॉनचे स्वरूप असते. या भाषेत सूचनांसाठी क्रमांक द्यावे लागत नाहीत. जर क्रम बदलून काही सूत्रे सोडवायची असली तरच विशिष्ट ओळींना क्रमांक द्यावा लागतो.

इनपुट आणि आउटपुट साधनांसाठी लिहिलेल्या खास सूचना, हे एक फोट्रॉनचे वैशिष्ट्य आहे. या शिवाय तार्किक, सूत्रमय आणि तुलना अशा प्रकारच्या अन्य अनेक सूचना असतातच.

फोट्रॉनचे मतभेद | LIMITATIONS OF FORTRAN IN MARATHI

अलिकडे फोर्ट्रान ही भाषा मागे पडत चालली आहे. फोट्रॉनचा उपयोग करून ज्या गोष्टी करता येतात, त्या सर्व आधुनिक बेसिक भाषा करू शकते.

फोट्रॉन ही बेसिक पेक्षा पुष्कळच अवघड आहे. त्यामुळेच नवागत फोट्रॉनपेक्षा बेसिक भाषा पसंत करतात.

हे सुद्धा वाचा