संगणकामधील भाषांच्या पिढ्या मराठी मध्ये | GENERATIONS OF COMPUTER LANGUAGES IN MARATHI

संगणकामधील भाषांच्या पिढ्या

संगणकामधील भाषांच्या पिढ्या | GENERATIONS OF COMPUTER LANGUAGES IN MARATHI – विद्युतमंडलाच्या तंत्रात जस जशी सुधारणा होत गेली, तस तशी संगणकाचीही कार्यक्षमता भूमितीश्रेणीने वाढली.

त्यातूनच संगणकाच्या पिढ्या असा शब्द रूढ झाला. पुढच्या पिढीचा संगणक आधीच्या पिढीपेक्षा जास्त उच्च दर्जाचा उरला, तो या तंत्रज्ञानातील क्रांती मुळेच ! ही झाली हार्डवेअर मधील प्रगती !

त्या बरोबरच सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्रॅम आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषा यांच्या तंत्रातही आमूलाग्र बदल होत गेला. आणि अर्थातच भाषांच्याही पिढ्या निर्माण झाल्या.

संगणकामधील भाषांच्या पिढ्या मराठी मध्ये | GENERATIONS OF COMPUTER LANGUAGES IN MARATHI

सध्या आपण तिसऱ्या पिढीच्या भाषांमधून चौथ्या पिढीच्या भाषांमध्ये प्रवेश करीत आहोत.

पहिली पिढी

अगदी सुरूवातीला मशीन लँग्वेजमध्ये प्रोग्रॅम लिहिले जात. प्रत्येक संगणकासाठी ही मशीन लँग्वेज निराळी असे. संगणकाच्या भाषांची पहिली पिढी ती हीच !

दुसरी पिढी

मशीन लँग्वेजमधील प्रोग्रॅम लिहिण्याचा किचकटपणा टाळण्यासाठी अॅसेम्ब्ली लैंग्वेज निर्माण झाली. ती सुद्धा विद्युत्मंडलांच्या रचनेवर अवलंबून असल्यामुळे, सगळ्याच संगणकांसाठी सारखी नव्हती.

हीच संगणकांच्या भाषांची दुसरी पिढी !

तिसरी पिढी

अॅसेंब्ली लँग्वेजमध्येही प्रोग्रॅम लिहिणं सोप काम नाही हे लक्षात आल्यावर, बेसिक, फोर्टान, कोबोल अशा उच्च पातळीच्या भाषा निर्माण झाल्या.

त्यांनाच संगणकाच्या भाषांची तिसरी पिढी असं म्हणायला हरकत नाही. आता चौथ्या पिढीच्या भाषांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.

उच्च पातळीच्या भाषांमध्ये प्रोग्रॅम लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत किंवा प्रोसिजर असते. विशिष्ट उद्देश साधण्यासाठी प्रोग्रॅम लिहिणाऱ्याला विशिष्ट पायऱ्यांचाच अवलंब करावा लागतो. म्हणूनच त्यांना ‘प्रोसिजरल लँग्वेज’ असं म्हणतात.

उदाहरणार्थ नावांची यादी आद्याक्षरांच्या अनुक्रमाने लावायची असेल, तर विशिष्ट कृतीचाच अवलंब करणं भाग असत. या उलट चौथ्या पिढीच्या भाषांसाठी अशी विशिष्ट कार्यपद्धतीची जरूरी नसते.

‘काय उत्तर पाहिजे एवढंच प्रोग्रॅम लिहिणाऱ्याला सांगावं लागतं. ते उत्तरं कसं काढायचं त्याची कार्यपद्धती द्यावी लागत नाही. अलिकडे ‘डीबेस‘ ही एक लोकप्रिय भाषा आहे.

त्यामध्ये ‘नावांची यादी आद्याक्षरांप्रमाणे लावायची आहे अशा प्रकारची सूचना दिली की संपलं !

क्षणार्धात संगणक तशा प्रकारची यादी तुमच्या समोर हजर करतो. डीबेसमध्ये जे काम केवळ एका सूचनेने होते, त्यासाठी उच्च पातळीच्या भाषांमध्ये एक भला मोठा प्रोग्रॅम लिहावा लागतो.

चौथी पिढी

अर्थातच चौथ्या पिढीच्या भाषा तिसऱ्या पिढीतील उच्च पातळीच्या भाषांपेक्षा सोप्या असणार हे उघड आहे. त्यांचा उपयोग करण्यासाठी फारशा तर्कज्ञानाची आवश्यकता नसते.

त्या भाषेतील विशिष्ट सूचनांचा अर्थ समजला की झालं ! चौथ्या पिढीच्या भाषा प्रोग्रॅम लिहिणाऱ्याबरोबर जास्त जवळीक साधतील म्हणूनच त्यांना ‘युजर फ्रेंडली असं नाव बहाल करण्यात आलं आहे.

किंबहुना या भाषा वापरण्यासाठी व्यावसाइक प्रोग्रॅमरचीही जरूरी भासणार नाही. एखादी अनभिज्ञ व्यक्तिही या भाषांच्या सूचना पुस्तकांचा उपयोग करून प्रोग्रॅम लिहू शकेल.

हे सुद्धा वाचा