हाय लेव्हल लँग्वेज म्हणजे काय मराठी मध्ये | HIGH LEVEL LANGUAGE IN MARATHI

हाय लेव्हल लँग्वेज | HIGH LEVEL LANGUAGE IN MARATHI

हाय लेव्हल लँग्वेज म्हणजे काय मराठी मध्ये | HIGH LEVEL LANGUAGE IN MARATHI – संगणकाचा प्रोग्रॅम मशीन लँग्वेजमध्ये लिहायचा याचा अर्थ वेळेचा अपव्यय ! साध्या साध्या प्रोग्रॅमसाठी सुद्धा तासन् तास खर्च करावे लागतात.

बरं, त्यात काही चुका झाल्या तर त्या शोधून काढणं म्हणजे एक मोठी आपत्तीच ! एवढं करूनही एका संगणकाची मशीन लँग्वेज दुसऱ्याला चालत नाही.

या सगळ्या विपत्तीमधून मार्ग काढण्यासाठी हाय लेव्हल लँग्वेज निर्माण झाल्या. या संगणकाच्या सर्व भाषा इंग्रजी सदृश असतात. त्यामुळे अर्थातच त्या लिहायला आणि समजायला सोप्या !

संगणकाला मात्र त्यातील एकही भाषा समजत नाही, हे सांगायला नको !

हाय लेव्हल लँग्वेज भाषेचे कार्य | FUNCTION OF HIGH LEVEL LANGUAGE IN MARATHI

संगणकाला केवळ मशीन लँग्वेजच समजत असल्यामुळे, हाय लेव्हल लँग्वेजमध्ये लिहिलेला प्रोग्रॅम प्रथम मशीन लँग्वेजमध्ये भाषांतरित करावा लागतो, हे काम कंपायलर किंवा इंटरप्रिटर करतात.

कंपायलर किंवा इंरप्रिटर हेही प्रोग्रॅमच आहेत. त्यांचं काम फक्त दुभाष्याचं असतं. तुम्ही कोणत्याही उच्च भाषेत प्रोग्रॅम लिहिलात आणि त्याचा कंपायलर तुमच्या जवळ नसेल तर तुमचे सारे श्रम फुकट जातील.

हाय लेव्हल लँग्वेज भाषेचे उदाहरण | EXAMPLES OF HIGH LEVEL LANGUAGE IN MARATHI

अलिकडे डझनावारी हाय लेव्हल लँग्वेज निर्माण झाल्या आहेत. त्यातील बेसिक, फोट्रान, कोबोल, पास्कल, वगैरे नावे बरीच प्रसिद्ध आहेत.

कुणा एका व्यक्तीला संगणकाच्या सर्वच्या सर्व उच्च पातळीच्या भाषा शिकणे शक्य होईल असं वाटत नाही.

हाय लेव्हल लँग्वेजचे फायदे | ADVANTAGES OF HIGH LEVEL LANGUAGE IN MARATHI

हाय लेव्हल लँग्वेजचे अनेक फायदे आहेत. संगणकाची विशेष माहिती नसलेल्या अगदी सामान्य माणसाला सुद्धा या भाषांमधून प्रोग्रॅम्स लिहिता येतात.

संगणक कोणताही असला तरी या भाषा त्या सर्वांसाठी चालतात. उदाहरणार्थ, बेसिक ही उच्च पातळीची भाषा अॅपल, आयबीएम्, कमाडोर वगैरे कोणत्याही संगणकासाठी वापरता येते.

संगणकाप्रमाणे त्यात थोडे फार फरक असले, तरी ते आत्मसात करायला वेळ लागत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे या भाषा जागतिक आहेत.

संगणकात प्रोग्रॅम संग्रहित करण्याचं काम की-बोर्ड च्या साह्याने केलं जातं. परंतु ते करताना किंवा प्रत्यक्ष प्रोग्रॅम लिहिताना त्यात काही ना काही चुका राहून जातात.

परंतु हाय लेव्हल लँग्वेजचा विशेष असा आहे की, कोणत्या चुका झाल्या आहेत ते दाखवून देण्याची त्यामध्ये व्यवस्था केलेली असते. त्यामुळे प्रोग्रॅमची अंमलबजावणी फार लवकर होऊ शकते.

अशा या विविध फायद्यामुळे संगणकाचे प्रोग्रॅम हाय लेव्हल लँग्वेज मध्येच लिहिले जातात. मुद्दाम मशीन लैंग्वेजमध्ये प्रोग्रॅम लिहिण्याचं धाडस कुणीही सहसा करीत नाही.

हे सुद्धा वाचा