संगणकात प्रॉम्प्ट मध्ये प्रोग्राम कसा लिहायचा | HOW TO WRITE A PROGRAM IN A PROMPT IN MARATHI

परिचय

संगणकात प्रॉम्प्ट मध्ये प्रोग्राम कसा लिहायचा | HOW TO WRITE A PROGRAM IN A PROMPT IN MARATHI – ४० सेंटीमीटर लांब, ४० सेंटीमीटर रूंद, आणि साधारण १५ सेंटीमीटर उंच, अशा मापाची एक पत्र्याची पांढरी पेटी, त्यावर टीव्ही सारखा दिसणारा मॉनिटर म्हणजे दर्शक, समोर ४५ सेंटीमीटर लांब आणि १५ सेंटीमीटर रूंदीचा नाजूक की-बोर्ड, आणि बाजूला प्रिंटर असं व्यक्तिगत संगणकाचं स्वरूप असतं.

आपण जे जे की-बोर्डवर टाइप करतो ते सर्व मॉनिटरच्या पडद्यावर पहायला मिळतं. परंतु संगणकाचं विद्युत्बटण चालू केलं की लगेच की-बोर्ड वरील बटण दाबून आपण संगणकात प्रोग्रॅम लिहू शकत नाही.

त्याच्या आधी काही महत्त्वाच्या क्रिया कराव्या लागतात.

संगणकात प्रॉम्प्ट मध्ये प्रोग्राम कसा लिहायचा | HOW TO WRITE A PROGRAM IN A PROMPT IN MARATHI

संगणकाच्या पेटीवर, समोरच्या बाजूला दोन खाचा तुम्हाला पहायला सांपडतील. त्या खाचा, आतमध्ये बसवलेल्या दोन डिस्क ड्राइव्हजूच्या असतात.

त्यातील एकाला ‘ड्राइव्ह ए’ व दुसऱ्याला ‘ड्राइव्ह बी’ असं नाव आहे. संगणकाचं कार्य सुरू होण्यासाठी, ‘ड्राइव्ह ए’ मध्ये डिस्क ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजेच ‘डॉस’ संग्रहित केलेली फ्लॉपी ठेवावी लागते.

ती आत सरकवून ड्राइव्ह ए चं बटण बंद करायचं आणि संगणकाचा व मॉनिटरचा. विद्युत् प्रवाह चालू करायचा. थोड्याच वेळात मॉनिटरवर निरनिराळे संदेश दिसू लागतील आणि त्याच वेळी संगणक आपली सर्व मेमरी तपासू लागेल.

मॉनिटरच्या पडद्यावर झरझर आकडे बदलताना पहायला मिळतील. संगणक दोन वेळा आपली मेमरी तपासून पाहील. व्यक्तिगत संगणकाची मेमरी साधारण ६४० किलोबाइट असते.

ती तपासून झाली की आकड्यांमधील बदल थांबेल आणि ड्राइव्ह ए वरील तांबडा दिवा लागेल.

स्टेप्स

आता संगणकातून अगदी लहान आवाजात घर घर ऐकू येईल. ड्राइव्हमध्ये फ्लॉपी भ्रमण करू लागली की असा आवाज येतो.

थोड्याच वेळात मॉनिटरच्या पडद्यावर आणखी काही संदेश उमटतील.

पहिल्या प्रथम संगणक तुम्हाला आजचा दिनांक विचारील. ही माहिती दिलीच पाहिजे असं नाही.

एन्टर नावाचं की-बोर्ड वरील बटण दाबून आपण पुढे जाऊ शकतो.

त्यानंतर संगणक तुम्हाला वेळ विचारील. ही माहिती सुद्धा आपण टाळू शकतो.

पुन्हा एकदा एन्टर बटण दाबलं की काम झालं. ही क्रिया संपली की लगेच इंग्रजी A हे अक्षर आणि त्याच्या समोर कोनाकृती चिन्ह उमटेल.

ते ‘A>’ अशा प्रकारचे दिसेल. यालाच ‘ए प्रॉम्प्ट‘ असं नाव आहे.

आता संगणक तुमच्या आज्ञा पाळायला सिद्ध झाला आहे. त्याला कसं वापरायचं हे तुम्हाला त्याच्याकडून काय करून घ्यायचं याच्यावर बरचसं अवलंबून आहे.

हे सुद्धा वाचा