मशीन लैंग्वेज / मशीनी भाषा म्हणजे काय मराठी मध्ये | MACHINE LANGUAGE IN MARATHI

व्याख्या

मशीन लैंग्वेज / मशीनी भाषा म्हणजे काय मराठी मध्ये | MACHINE LANGUAGE IN MARATHI – एखाद्या दूरच्या खेड्यात गेलात आणि तेथील शेतकऱ्याबरोबर इंग्रजी भाषेत संभाषण सुरू केलंत तर काय होईल ?

तो शेतकरी तुमच्या चेहऱ्याकडे निर्विकार चेहऱ्याने पहात राहील, हे सांगायला नकोच !

त्याची मातृभाषा मराठी असेल तर त्याला मराठीतून बोललेलंच फक्त समजेल. संगणकाचंही अगदी तसंच आहे. त्याच्या एका मातृभाषा आहे, तिचं नाव ‘मशीन लँग्वेज’ !

मशीन लैंग्वेज / मशीनी भाषा म्हणजे काय मराठी मध्ये | MACHINE LANGUAGE IN MARATHI

संगणकाला फक्त हीच भाषा समजते. संगणकाची ही मातृभाषा शून्य आणि एक या दोनच आकड्यांच्या साह्याने लिहिता येते.

संगणकाचा प्रोग्रॅम या भाषेत लिहिला तर संगणक तो अतिशय त्वरेने आमलात आणू शकतो. अगदी सुरूदातीच्या काळात मशीन लँग्वेजमध्येच प्रोग्रॅम्स लिहिले जात.

परंतु त्यासाठी काही महिन्यांचाही काळ लागे. त्यात अनेक चुका होत आणि त्या शोधून काढणं म्हणजे एक डोकेदुखीच होती.

अर्थातच संगणकाच्या मातृभाषेत प्रोग्रॅम लिहिणं हे फार कठीण काम होतं. तसल्या भानगडीत आता कोणी पडत नाही.

त्यातूनही एका प्रकारच्या संगणकाची मशीन लँग्वेज तुम्ही आत्मसात केलीत, तरी दुसऱ्या प्रकारच्या संगणकासाठी ती निरूपयोगी ठरते.

थोडक्यात काय, आयबीएम संगणकाची मशीन लँग्वेज आणि अॅपल संगणकाची मशीन लँग्वेज यात काहीच ताळमेळ नसतो.

की-बोर्डच्या साह्याने आपण संगणकाकडे जी जी माहिती पाठवा, तिचे प्रथम मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर केले जाते, आणि नंतरच संगणकाला त्याचा अर्थ समजतो.

अलिकडे प्रोग्रॅम लिहिण्यासाठी नवनव्या भाषा निर्माण झाल्या आहेत पण त्यात कोणतीही भाषा संगणकाला समजत नाही. त्याला मशीन लँग्वेजशिवाय दुसरं काहिही समजत नाही.

हे सुद्धा वाचा