मायक्रोप्रोग्रॅम म्हणजे काय मराठी मध्ये | MICRO PROGRAM IN MARATHI

मायक्रोप्रोग्रॅम म्हणजे काय मराठी मध्ये | MICRO PROGRAM IN MARATHI

मायक्रोप्रोग्रॅम म्हणजे काय मराठी मध्ये | MICRO PROGRAM IN MARATHI – गणिती सूत्रे असलेले प्रोग्रॅम लिहिताना त्यामध्ये विविध प्रकारच्या क्रियांचा सातत्याने संबंध येतो.

वर्ग, वर्गमूळ, धात, लॉगेरिथम्, तसेच साइन, कॉस, टॅन वगैरे त्रिकोणमितीमधील कृत्ये, या वारंवार लागणाऱ्या क्रिया आहेत.

या प्रत्येक क्रियेसाठी स्वतंत्र प्रोग्रॅम लिहून तो मूळ प्रोग्रॅममध्ये समाविष्ट करता येईल, पण त्यामुळे मूळ प्रोग्रॅमची लांबी तर वाढेलच आणि त्याच्या कार्यवाहीसाठी जास्त काळ लागेल.

परंतु अशा प्रकारच्या नेहमी लागणाऱ्या गणिती क्रियांचे प्रोग्रॅम संगणकाच्या मेमरीत कायमचे संग्रहित करून ठेवले, तर पाहिजे त्यावेळी त्यांचा ताबडतोब उपयोग करता येईल.

त्यामुळेच अलिकडे विशेषतः छोट्या संगणकात अशा अनेक गणिती क्रियांचे प्रोग्रॅम कायमचे संग्रहित करून ठेवण्यात येतात आणि संगणकाबरोबरच गि-हाइकाला ते निर्मात्याकडून आपोआप प्राप्त होतात.

अशा हार्डवेअरमध्ये म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या इंटिग्रेटेड सर्किटस्मध्ये कायमच्या संग्रहित करून ठेवलेल्या सॉफ्टवेअरलाच मायक्रोप्रोग्रॅम किंवा फर्मवेअर असं नाव आहे.

काही छोट्या संगणकात ऑपरेटिंग सिस्टिमसुद्धा फ्लॉपी डिस्क ऐवजी हार्डवेअरमध्येच कायमची संग्रहित करून ठेवली जाते.

स्पेक्ट्रम, इलेक्ट्रॉन, बीबीसी मायक्रो, हे संगणक त्यांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.

संगणकात मायक्रोप्रोग्रामचे कार्य | FUNCTION OF MICRO PROGRAM IN MARATHI

संगणकाचा वापर करणाऱ्याने लिहिलेला प्रोग्रॅम रॅम चिप मध्ये जातो. पण विद्युत्प्रवाह बंद केला की रॅममधील प्रोग्रॅमही नाहीसा होतो.

परंतु रीड ओन्ली मेमरी किंवा रॉमचिपमधील प्रोग्रॅम मात्र विद्युत्प्रवाह बंद केला तरी नष्ट होत नाही. अर्थातच मायक्रोप्रोग्रॅम्स हे नेहमी रॉम चिपमध्ये संग्रहित केले जातात.

संगणक वापरणारी व्यक्ती त्यामध्ये बद्दल करू शकत नाही, किंवा त्यामध्ये नवीन भरही घालू शकत नाही. रॉममधील मायक्रोप्रोग्रॅम त्याला फक्त वापरता येतात.

रॉम चिप् संगणकाच्याच विद्युत्मंडलांमध्ये समाविष्ट केल्यामुळे क्षणार्धात मायक्रोप्रोग्रॅमकडून मिळालेली उत्तरे मुख्य प्रोग्रॅमला आपोआप उपलब्ध होतात.

प्रोग्रॅमेबल रीड ओन्ली मेमरी (प्रॉम्) आणि इरेजेबेल प्रोग्रॅमेबल रीड ओन्ली मेमरी (इ-प्रॉम्) | PROM AND E-PROM IN MARATHI

रॉम चिप् शिवाय ‘प्रोग्रॅमेबल रीड ओन्ली मेमरी म्हणजेच ‘प्रॉम्’ आणि ‘इरेजेबेल प्रोग्रॅमेबल रीड ओन्ली मेमरी’ म्हणजेच ‘इ-प्रॉम्’ अशा आणखी दोन प्रकारच्या चिप्स बाजारात उपलब्ध आहेत.

त्यांचा उपयोग करून संगणक वापरणारी व्यक्ती आपल्याला पाहिजेत ते प्रोग्रॅम्स संगणकात कायमचे संग्रहित करू शकते.

निर्मात्यांनी पुरविलेल्या मायक्रोप्रोग्रॅमशिवाय स्वतःच्या उपयोगाचे अन्य अनेक प्रोग्रॅम्स त्याला मुख्य प्रोग्रॅममध्ये वापरता येतात.

प्रॉम वर एकदा लिहिलेले प्रोग्रॅम्स पुसून टाकता येत नाहीत पण, इ-प्रॉम वरील प्रोग्रॅम मात्र पुसून टाकता येतात, आणि या विशिष्ट चिप्स पुन्हा पुन्हा नव्या मायक्रोप्रोग्रॅमसाठी उपयोगात आणता येतात.

हे सुद्धा वाचा