मल्टिटास्किंग म्हणजे काय मराठी मध्ये | WHAT IS MULTITASKING IN MARATHI

मल्टिटास्किंग म्हणजे काय मराठी मध्ये | WHAT IS MULTITASKING IN MARATHI

मल्टिटास्किंग म्हणजे काय मराठी मध्ये | WHAT IS MULTITASKING IN MARATHI – मल्टिटास्किंग याचा अर्थ आहे, एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता ! ऑपरेटिंग सिस्टिममुळे संगणकाला अशी क्षमता प्राप्त होऊ शकते. एकाच व्यक्तीचे अनेक प्रोग्रॅम एक संगणक एकाच वेळी हाताळू शकतो.

तसं पाहिलं तर मल्टिटास्किंग हा मल्टिप्रोग्रॅमिंगचाच एक विशेष प्रकार आहे. मल्टिटास्किंगमुळे संगणक वापरणारी व्यक्ती एका प्रोग्रॅममधील चुका दुरूस्त करीत असताना दुसऱ्या प्रोग्रॅमची अंमलबजावणी करू शकते, किंवा एकाच वेळी मॉनिटरच्या पडद्यावर दोन्ही प्रोग्रॅम त्याला पहाता येतात.

अगर एकाच वेळी त्यांच्यामध्ये सुधारणाही करता येतात. या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संगणक एका वेळी एकच काम करतो.

परंतु त्याच्या विलक्षण गतीमुळे, वापरणाऱ्याला असं वाटतं की तो एकाच वेळी अनेक कामं करीत आहे.

मल्टिटास्किंग चा उपयोग

काही प्रोग्रॅम इतके क्लिष्ट आणि लांबलचक असतात, की त्यांची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी कित्येक मिनिटांचा काळ लागतो. मल्टिटास्किंगचा खरा उपयोग याच वेळी होतो.

कारण त्या काळात कदाचित दुसऱ्या काही कामासाठी संगणकाची आवश्यकता भासते.

उदाहरणार्थ

उदाहरणार्थ, समजा एखाद्या कारखान्यात हजारो कामगार आहेत, आणि त्यामधील सहा वर्षे नोकरी केलेल्या आणि संगणकाचे ज्ञान आत्मसात करू शकतील अशा २५ ते ३० या वयोगटातील कामगारांची माहिती हवी आहे.

आता लहान संगणकावर अशा प्रकारचा प्रोग्रॅम करायचा झाला, तर त्याच्या कार्यवाहीसाठी त्या संगणकाला कित्येक मिनिटे लागतील.

वरील प्रश्नाचं उत्तर शोधीतअसताना संगणकाचा दुसऱ्या काही कामासाठी उपयोग करता येईल. मल्टिटास्किंग मुळेच ही गोष्ट शक्य होते.

हे सुद्धा वाचा