नेटवर्क म्हणजे काय | NETWORK IN MARATHI | NETWORK TOPOLOGY IN MARATHI | NETWORKING IN MARATHI

नेटवर्क म्हणजे काय | WHAT IS A NETWORK IN MARATHI

नेटवर्क म्हणजे काय | NETWORK IN MARATHI | NETWORK TOPOLOGY IN MARATHI | NETWORKING IN MARATHI – नेटवर्क हा शब्द काही आपल्याला नवा नाही.

दररोज दूरदर्शनाच्या पडद्यावर तो आपल्याला पहायला मिळतो.

राष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातील सर्व दूरदर्शन केंद्र संलग्न करण्यात येतात आणि त्या सर्वांसाठी एकच कार्यक्रम प्रक्षेपित केला जातो.

तसं पाहिलं तर नेटवर्कची पद्धत आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे.

जवळजवळ रहाणारे अनेक जण एकत्र येऊन आपल्या दूरदर्शनचं एक नेटवर्क तयार करतात.

मग सर्वांना मिळून एकच कार्यक्रम पहाता येतो. सध्या हे फॅड चांगलंच मूळ धरू लागलं आहे.

संगणकाच्या नेटवर्कची कल्पना काहीशी अशीच आहे.

या पद्धतीत अनेक संगणक एका मध्यवर्ती संगणकाशी जोडले जातात, आणि त्यामध्ये संग्रहित केलेली माहिती एकाच वेळी अनेकांना उपलब्ध होऊ शकते.

नेटवर्किंग चे काम | FUNCTIONS OF NETWORKING

संगणकांचं नेटवर्क दोन विशिष्ट कामांसाठी केलं जातं. अमेरिकेतील मोठ मोठे उद्योग, आपल्या कारखान्यातील अधिकारी वर्ग आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी संगणकांचं नेटवर्क तयार करतात.

ते विशिष्ट इमारतीपुरतं मर्यादित असतं किंवा त्याचा उपयोग लहान क्षेत्रफळापर्यंत मर्यादित असतो.

या नेटवर्क मध्ये कंपनीचे अधिकारी घरी बसूनही कंपनीची कामे करू शकतात.

दुसऱ्या प्रकारचं नेटवर्क अतिशय विस्तृत क्षेत्रफळासाठी केलं जातं त्यामध्ये संबंध देश किंवा दोनचार देशांचा समूह यांचा सहभाग असू शकतो.

पुढे मागे आंतरखंडीय नेटवर्कही निर्माण होईल.

या विस्तृत नेटवर्कचा उपयोग संदेशांची देवाण घेवाण करण्यासाठी केला जातो.

बिनतारी संदेश, दूरध्वनी, यांच्यासाठी या नेटवर्कचा उपयोग होईलच, पण दोन देशातील महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाणही त्याच्या मार्फत होऊ शकेल.

नेटवर्किंग च्या पातळ्या | LEVELS OF NETWORKING

नेटवर्क तयार करण्याच्या तीन पातळ्या मानल्या जातात. नेटवर्कचा किती उपयोग होईल त्यावरून ते कोणत्या पातळीत करायचे हे निश्चित करण्यात येते.

नेटवर्कची पहिली पातळी | FIRST LEVEL OF NETWORKING

पहिल्या पातळीत दोन संगणक परस्परांबरोबर फक्त संदेशांची देवाण घेवाण करू शकतात.

नेटवर्कची दुसरी पातळी | SECOND LEVEL OF NETWORKING

दुसऱ्या पातळतील नेटवर्क अनेक संगणक, एकच संग्राहक साधन आणि त्यामध्ये संग्रहित केलेली माहिती वापरू शकतात.

नेटवर्कची तिसरी पातळी | THIRD LEVEL OF NETWORKING

तिसऱ्या पातळीच्या नेटवर्क मधील संगणक एकमेकांचे प्रोसेसर्स आणि मेमरी वापरू शकतात.

प्रत्येक पातळीबरोबर नेटवर्कची कार्यक्षमता प्रचंड पटीने वाढणार हे उघड आहे.

नेटवर्किंगचे प्रकार | NETWORK TOPOLOGY IN MARATHI

संगणकाचे नेटवर्क निर्माण करण्याचे एकंदर तीन प्रकार आहेत. स्टार, बस आणि रिंग अशी त्यांची नावे आहेत.

स्टार नेटवर्क | STAR NETWORK IN MARATHI

स्टार नेटवर्कमध्ये अनेक लहान संगणक एका मध्यवर्ती संगणकाबरोबर सरळ जोडण्यात येतात.

बस नेटवर्क | BUS NETWORK IN MARATHI

शहरात धावणाऱ्या बसेस् प्रमाणेच बस नेटवर्कचे काम चालते. शहरातील बस स्टॉपवर थांबली, की त्यातून काही उतारू खाली उतरतात, तर काही नवीन उतारू बसमध्ये चढतात.

बस नेटवर्कमधील बस स्टॉप्स म्हणजे निरनिराळे संगणक आणि त्यामध्ये चढ उतार करणारे उतारू म्हणजे डाटा किंवा माहिती.

रिंग नेटवर्क | RING NETWORK IN MARATHI

रिंग नेटवर्कमध्ये एकही मध्यवर्ती संगणक नसतो. सर्व संगणक साखळी प्रमाणे एकमेकांना जोडलेले असतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या डाटाला सर्व संगणकातून प्रवास करावा लागतो.

नेटवर्किंग चे महत्त्व | IMPORTANCE OF NETWORKING IN MARATHI

एक काळ असा होता की मनुष्याची सर्व कामे त्याच्या शक्तीवर अवलंबून होती. त्यामुळे एखादा शक्तीशाली धटिंगण सर्वांना गुंडाळून ठेवीत असे.

आता माणसाची बहुतांश कामे त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहेत. युद्ध करण्यासाठी सुद्धा आता शारीरिक शक्तीची आवश्यकता भासत नाही.

बुद्धीच्या व्यवहारात विचार आणि माहिती यांच्या देवाण घेवाणीला फार महत्त्व आहे.

संगणकांच्या नेटवर्कमुळे कोणत्याही व्यक्तीला, जगातील साऱ्या साधनसंपत्तीची माहिती घरच्या घरी मिळू शकेल, आणि त्याच्या विचारांच्या कक्षाही रूंदावतील.

हे सुद्धा वाचा