ऑपरेटिंग सिस्टिममधील प्रोग्रॅमचे प्रकार | TYPES OF PROGRAMS IN OPERATING SYSTEM IN MARATHI

ऑपरेटिंग सिस्टिममधील प्रोग्रॅमचे प्रकार | TYPES OF PROGRAMS IN OPERATING SYSTEM IN MARATHI

ऑपरेटिंग सिस्टिममधील प्रोग्रॅमचे प्रकार | TYPES OF PROGRAMS IN OPERATING SYSTEM IN MARATHI – मोठ्या ऑफिसचा मॅनेजर आणि संगणकाची ऑपरेटिंग सिस्टिम यांच्या कामाचं स्वरूप सारखंच आहे. ऑफिसचा मॅनेजर त्याच्या हाताखालील लोकांना हुकूम सोडून ऑफिसचा गाडा सांभाळतो, तर ऑपरेटिंग सिस्टिम आपल्या निरनिराळ्या प्रोग्रॅमच्या माध्यमातून संगणकाचे कार्य व्यवस्थित चालले आहे की नाही ते पहाते.

पूर्वीचे सम्राट सुभेदारांच्या मार्फत निरनिराळ्या प्रांतांवर आपली हुकूमत गाजवीत असत.

ऑपरेटिंग सिस्टिममधील प्रोग्रॅमचे प्रकार

प्रोग्रॅम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टिमचे अंमलदार आहेत असं म्हणायला हरकत नाही. या अंमलदारांचे दोन प्रकार आहेत. त्यातल्या एकाला कंट्रोल किंवा नियंत्रक प्रोग्रॅम व दुसऱ्याला प्रोसेसर किंवा संस्कारक प्रोग्रॅम असं नाव आहे.

कंट्रोल प्रोग्रॅम | CONTROLLER PROGRAM

कंट्रोल प्रोग्रॅम संगणकाच्या कार्यावर देखरेख करतात. त्यांना आपण पर्यवेक्षक असं नाव देऊ शकतो. यामध्ये मुख्यतः तीन प्रकारच्या प्रोग्रॅमचा समावेश असतो. मॉनिटर प्रोग्रॅम, संगणकाच्या कामाचे वेळापत्रक तयार करतात.

इनपुट आउट्पुट् कंट्रोल प्रोग्रॅम, इनपुट, आउटपुट साधनांची संगणकाशी सांगड घालतात, आणि आवश्यक असलेले साधन संगणकाला उपलब्ध करून देतात.

जॉब कंट्रोल प्रोग्रॅम संगणकाकडे कार्यवाहीसाठी आलेल्या विविध प्रोग्रॅमचे क्रमांक लावून त्या प्रमाणे त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते पहातात.

प्रोसेसर प्रोग्रॅम | PROCESSOR OR MODIFIER PROGRAM

प्रोसेसर प्रोग्रॅममध्ये मुख्यतः लँग्वेज ट्रान्सलेटर आणि सर्व्हिस प्रोग्रॅमचा अंतर्भाव होतो. त्यापैकी लँग्वेज ट्रान्सलेटर उच्च पातळीच्या भाषेतील प्रोग्रॅमचे मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करतात, आणि आधी संग्रहित केलेल्या प्रोग्रॅममध्ये सुधारणा, दोन प्रोग्रॅमचे एकत्रीकरण, एका साधनावरून दुसऱ्या साधनावर प्रोग्रॅमची कॉपी, अशी विविध कामे सर्व्हिस प्रोग्रॅमवर सोपविण्यात आली आहेत.

ऑपरेटिंग सिस्टिममधील हे सर्व प्रोग्रॅम नसतील ना, ‘तर प्राण वाचून कुडी’ अशी संगणकाची अवस्था होईल !


हे सुद्धा वाचा