संगणकाचे प्रकार – अॅनालॉग, डिजिटल, हायब्रीड संगणक | TYPES OF COMPUTER – ANALOG, DIGITAL, HYBRID IN MARATHI

संगणकाचे तीन प्रकार | TYPES OF COMPUTER IN MARATHI

संगणकाचे प्रकार – अॅनालॉग, डिजिटल, हायब्रीड संगणक | TYPES OF COMPUTER – ANALOG, DIGITAL, HYBRID IN MARATHI – एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती अशी, की ज्या साधनाच्या साह्याने कोणत्याही प्रकारचे मापन किंवा गणन करता येते, अशा कोणत्याही साधनाला संगणक असं नाव देता येईल.

  • अॅनालॉग संगणक
  • डिजिटल संगणक
  • हायब्रीड संगणक

या व्याख्येप्रमाणे संगणकाच्या प्रत्येक प्रकारची थोडक्यात ओळख करून घेणं सोपं ठरेल.

अॅनालॉग संगणक | ANALOG COMPUTER IN MARATHI | संगणकाचे प्रकार

अॅनालॉग संगणक | ANALOG COMPUTER IN MARATHI

शरीराचे तापमान आपण थर्मामीटरने पहातो. धर्मामीटरच्या टोकाला असलेल्या पायाला उष्णता लागली, की पारा नळीत वर चढतो आणि काचेच्या नळीवर कोरलेल्या आकड्यांवरून आपल्याला ताप किती आहे, ते समजते.

स्प्रिंग बॅलन्स तुम्ही पाहिलेला असणार. त्याच्या हुक्ला पदार्थ ३. अडकविला, की काट्यावरील दर्शक खाली सरकतो आणि आपल्याला त्या पदार्थाचे वजन मोजता येते.

विद्युत्दाब मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा उपयोग करतात. तो विद्युत्मंडलातील दोन बिंदूना जोडला, म्हणजे मीटरवरील काटा सरकतो आणि एखाद्या विशिष्ट ठिकाणी स्थिरावतो.

काटयाच्या स्थितीवरून आपल्याला त्या दोन बिंदूंमधील विद्युत्दाब समजतो. ही सर्व अॅनालोग संगणकाची उदाहरणे आहेत.

नेहमीच्या व्यवहारात अशा प्रकारचे अॅनालॉग संगणक आपण सहज हाताळत असतो.

अॅनालॉग संगणकात मापन किंवा गणन करण्यासाठी प्रत्यक्ष अंकांचा उपयोग करीत नाहीत. अशा संगणकात चल संख्या, एखाद्या सलग मापन श्रेणीवर मोजण्यात येते.

पदार्थाच्या एखाद्या विशिष्ट गुणधर्माचा उपयोग मापन करण्यासाठी केला जातो. थर्मामीटरमध्ये पाऱ्याचे प्रसरण; तापमानाचे प्रमाणात बदलते.

स्प्रिंग बॅलन्समध्ये स्प्रिंगची लांबी वजनाच्या प्रमाणात वाढते. अशा प्रकारे त्या त्या अॅनालॉग संगणकात पदार्थांच्या विशिष्ट गुणधर्माचा उपयोग केलेला असतो.

या संगणकातील मापनाची अचूकता आधीच ठरलेली असते. त्यांच्या पेक्षा जास्त अचूक किंमत मिळू शकत नाही.

डिजिटल संगणक | DIGITAL COMPUTER IN MARATHI

डिजिटल संगणक | DIGITAL COMPUTER IN MARATHI

आपण बोटांचा उपयोग करून अंक मोजायला सुरुवात केली, की अभावितपणे डिजिटल संगणकाचा उपयोग करीत असतो. आपले प्रत्येक बोट एक अंक दर्शविते.

अंक मोजण्यासाठी बोटांचा उपयोग, हा अर्थातच अगदी साधा डिजिटल संगणक आहे. सध्या संगणक म्हटलं, की तो डिजिटल असलाच पाहिजे; असं समीकरण आहे.

डिजिटल संगणकाला आपण जी जी माहिती पुरवतो, तिचं प्रथम अंकात रूपांतर केलं जातं. तेही अर्थातच एक किंवा शून्य या भाषेत !

अत्यंत अचूकता हा डिजिटल संगणकाचा विशेष आहे. आयुबीएम् संगणकात १७ दशांश स्थळापर्यंत अचूक उत्तर काढता येतं.

तुमच्या खिशातील कॅसिओचा कॅल्क्युलेटर हे डिजिटल संगणकाचेच उदाहरण आहे.

हायब्रीड संगणक | HYBRID COMPUTER IN MARATHI

हायब्रीड संगणक | HYBRID COMPUTER IN MARATHI

अॅनालॉग आणि डिजिटल या संगणकातील उत्तम गुणांचे एकत्रकरण म्हणजे हायब्रीड संगणक ! अॅनालोग संगणकाची गती आणि डिजिटल संगणकाची अचूकता यांचा हायब्रीड संगणकात सुंदर. मिलाफ साधलेला असतो.

हायब्रीड संगणकासाठी लागणारा इन्पुट डाटा, काहीतरी मापन करून मिळविला जातो. त्यानंतर त्याचे अंकात रूपांतर करण्यात येते. या अंकावर संगणक प्रक्रिया करतो.

हॉस्पिटलमधील अती दक्षता विभागात ठेवलेल्या रोग्याच्या हृदयाचे ठोके, तापमान, वगैरे अनेक गोष्टी अॅनालोग संगणकाकडून मोजल्या जातात.

ह्या विविध मापनांचे अंकात रूपातर करून, ती संगणकाकडे पाठविण्यात येतात. त्यामुळे वस्तुतः संगणकच रोग्याच्या शरीरातील विविध हालचालींवर बारीक लक्ष ठेवतो.

समजा रोग्याच्या परिस्थितीत काही अचानक बदल झाला तर संगणक ताबडतोब रोग्याची देखभाल करणाऱ्या नर्सला सूचना देतो.

कित्येक मोठमोठ्या कारखान्यात उत्पादनाचे नियंत्रण हायब्रीड संगणकांकडून करण्यात येते.

अशा सर्व ठिकाणी अॅनालोग संगणकाचे आउटपुट हे डिजिटल संगणकाचे इन्पुट असते. हायब्रीड संगणकाची हीच मूलभूत संकल्पना आहे.

हे सुद्धा वाचा –