हाय लेव्हल लँग्वेज भाषेचे प्रकार मराठी मध्ये | TYPES OF HIGH LEVEL LANGUAGE IN MARATHI

हाय लेव्हल लँग्वेज भाषेचे प्रकार मराठी मध्ये | TYPES OF HIGH LEVEL LANGUAGE IN MARATHI

हाय लेव्हल लँग्वेज भाषेचे प्रकार मराठी मध्ये | TYPES OF HIGH LEVEL LANGUAGE IN MARATHI – सर्व उच्च पातळीच्या भाषांची मुख्यतः पाच प्रकारात विभागणी करता येते. हे विभाग, त्या भाषांचा ज्या क्षेत्रात जास्त उपयोग केला जातो, त्याच्या आधारावर तयार केले आहेत.

ती क्षेत्रे अशी :

  • व्यापार
  • विज्ञान
  • विशिष्ट उद्देश
  • आज्ञा दर्शक
  • बहुउद्देशीय

केवळ व्यापारी कामासाठी ज्या भाषांचा उपयोग केला जातो त्यामध्ये कोबोल ही भाषा प्रमुख आहे. या भाषांकडे फाइल्स हाताळण्याची उत्कृष्ट क्षमता असावी लागते.

यांची रचना साधारण इंग्रजी भाषेतील वाक्यांप्रमाणेच असते. त्यामध्ये गणिती खुणांचा वापर फारसा करीत नहीत. विविध प्रकारची टेबल्स, रिपोर्टस्, फॉर्मस् वगैरे व्यापारोपयोगी गोष्टी, या भाषांच्या द्वारे फार चांगल्या प्रकाराने करता येतात.

अल्गोल, फोट्रान, बेसिक, पास्कल, वगैरे भाषा मुख्यतः वैज्ञानिक भाषा ओळखल्या जातात. गणित, पदार्थविज्ञान या शास्त्रांसाठी त्यांचा उपयोग म्हणून होतो. संशोधनाच्या क्षेत्रातही त्यांनाच मान्यता आहे. किचकट गणिती सूत्रे

सोडविण्याची क्षमता, अनेक गणिती क्रिया आधीपासूनच संग्रहित करुन ठेवण्याची सोय, मोठमोठी टेबल्स आणि आकड्यांची किंवा नावांची सूची हाताळण्याची क्षमता, ही वैज्ञानिक भाषांची वैशिष्ट्ये आहेत.

विशिष्ट उद्देशासाठी निर्माण करण्यात आलेल्या भाषा दुसऱ्या कशासाठीही वापरता येत नाहीत. यंत्रांचे नियंत्रण, व्यवहारातील परिस्थितीची हुबेहूब निर्मिती, अवघड प्रयोगांची कार्यवाही, अशी या भाषांच्या कार्याची काही क्षेत्रे आहेत अडा, कोराल ६६, या भाषा अशा विशिष्ट्य उद्देशासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत.

आज्ञा दर्शक किंवा कमांड लँग्वेज विशेषतः ऑपरेटिंग सिस्टिममध्ये संगणकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जातात.

ज्या भाषा व्यापार आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रासाठी वापरता येतात त्यांना बहुउद्देशीय भाषा म्हणतात, बेसिक आणि पीएल्१, ही त्याची चांगली उदाहरणे आहेत.

हे सुद्धा वाचा