ऑपरेटिंग सिस्टम चे प्रकार | TYPES OF OPERATING SYSTEM IN MARATHI

ऑपरेटिंग सिस्टम चे प्रकार | TYPES OF OPERATING SYSTEM IN MARATHI

ऑपरेटिंग सिस्टम चे प्रकार | TYPES OF OPERATING SYSTEM IN MARATHI – पिसी डॉस्, एम् एस् डॉस, अॅपल डॉस, सीपी/एम् वगैरे नावे ऐकली की आपल्या डोळ्यासमोर काजवेच चमकायला लागतात. कित्येक जण हा काय भयंकर प्रकार आहे? असं समजून बुचकळ्यात पडतात.

या आणि अशाच अनेक लघुरूपांनी संगणकाबद्दल लोकांच्या मनात जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. ‘डॉस’ म्हणजे अर्थातच ‘डिस्क ऑपरेटिंग सिस्टिम’ या शब्दाचं लघुरूपांतर !

त्याच्या आधीची अक्षरे ती कोणत्या संगणकासाठी वापरण्यात येते ते सुचवितात. उदाहरणार्थ पिसी डॉस, आयबीएम् पिसी साठी, तर एम् एस् डॉस, आय्बी एम् पिसी बरोबर सुसंगत असणाऱ्या संगणकांसाठी वापरतात.

टॉस | TOS (TAPE OPERATING SYSTEM) IN MARATHI

ऑपरेटिंग सिस्टिम संगणकाच्या संपूर्ण कार्याचे व्यवस्थापन करते. परंतु ती संगणकाला चटकन् उपलब्ध होईल अशा प्रकारे संग्रहित करून ठेवली पाहिजे.

अगदी सुरूवातीला या कामासाठी कार्डांचा उपयोग करीत. पण नंतर जसजसा संगणकाचा व्याप वाढू लागला, तस तसा ऑपरेटिंग सिस्टिमचाही आकार म्हणजे संगणक चालविण्यासाठी लागणाऱ्या एकंदर प्रोग्रॅम्सची संख्याही वाढू लागली.

सुदैवाने १९५५ च्या सुमारास मॅग्नेटिक टेप हे साधन उपलब्ध झाले आणि प्रथमच त्यावर ऑपरेटिंग सिस्टिमचे प्रोग्रॅम संग्रहित करण्यात आले. त्यामुळे तिला नाव मिळालं टेप ऑपरेटिंग सिस्टिम’ किंवा ‘टॉस’ !

दुसऱ्या पिढीतील संगणकांचा टॉस हा एक अविभाज्य घटक होता.

डॉस | DOS (DISK OPERATING SYSTEM) IN MARATHI

१९६० ते १९६५ या काळात मॅग्नॅटिक डिस्कचं तंत्र पूर्णत्वाला गेलं, मॅग्नॅटिक डिस्कवरील कुठेही असलेली माहिती काही क्षणात हस्तगत करता येते.

या तिच्या वैशिष्ट्यपूर्ण फायद्यामुळे मॅग्नॅटिक टेप मागे पडली आणि ऑपरेटिंग सिस्टिमचे प्रोग्रॅम मॅग्नॅटिक डिस्कवर संग्रहित करण्यात येऊ लागले.

त्यामुळे तिला नाव देण्यात आलं डिस्क ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे ‘डॉस’ परंतु लवकरच संगणकाचं क्षेत्र इतकं विस्तृत झालं आणि त्याच्या कामातील गुंतागुंत इतकी वाढली, की नवीन, अत्याधुनिक आणि सर्व प्रश्नांना तोंड देऊ शकेल अशी ऑपरेटिंग सिस्टिम निर्माण करणं भाग पडलं.

आता तिला फक्त ‘ऑस’ म्हणजे ऑपरेटिंग सिस्टिम या मूळ नावानंच ओळखण्यात येऊ लागलं. ‘ऑस’ ही ‘डॉस पेक्षा उच्च पातळीची ऑपरेटिंग सिस्टिम मानली जाते.

साधारणपणे छोट्या संगणकासाठी डॉस आणि मोठ्या कार्यक्षमतेच्या संगणकांसाठी ऑस वापरली जाते.

मल्टिपल व्हर्चुअल सिस्टम (एम्व्हीएस्) | MVS (MULTIPLE VIRTUAL SYSTEM) IN MARATHI

१९८० साली नवीन धर्तीच्या अत्याधुनिक संगणकांसाठी ‘ऑस’ अपुरी पडेल हे लक्षात आलं. कारण आता अतिशय प्रचंड माहिती हाताळण्याची क्षमता संगणकात आली होती.

विशेषतः मेनफ्रेम संगणकांसाठी ऑसपेक्षा उच्च दर्जाची सिस्टिम आवश्यक होती. या नवीन निर्माण करण्यात आलेल्या सिस्टिमला नाव देण्यात आलं ‘मल्टिपल व्हर्चुअल सिस्टिम’ किंवा ‘एम्व्हीएस् !

मल्टिपल व्हर्चुअल एक्स्टेंडेड आर्किटेक्चर

संगणकाच्या मेमरीची क्षमता मेगाबाईट वरून गीगॅबाइट (अब्जावधी बाइट) च्या घरात जाऊन पोहोचल्यावर एमव्हीएस् सुद्धा अपुरी पडू लागली.

त्यामुळे ‘मल्टिपल व्हर्चुअल एक्स्टेंडेड आर्किटेक्चर’ ही ऑपरेटिंग सिस्टिम पुढे आली. एकाच वेळी ३२ बिटस् हाताळण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे.

ऑपरेटिंग सिस्टिम चे प्रकार

या शिवाय निरनिराळ्या संगणक निर्मात्यांनी स्वतःच्या संगणकांसाठी ऑपरेटिंग सिस्टिम निर्माण केल्या, त्या वेगळ्याच !

सध्या प्रचलित असलेल्या महत्त्वाच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर ओझरता दृष्टिक्षेप पुढे दिलेल्या एका कोष्टकाच्या साह्याने करता येईल.

SR. NOऑपरेटिंग सिस्टिमचे नावेकोणत्या डिव्हाइसमध्ये वापरले
01.PC-DOSIBM Personal Computer
02.MS-DOSComputer compatible with IBM
03.APPLE-DOSApple-2 Computer
04.CP/M8 Bit Microcomputer
05.TRS-DOSTRS-80 Computer
06.AMIGA-DOSCommodore Amiga Computer
07.MVS, OS / VS, VMIBM Main Frame Computer
08.GC OSHoneywell Mainframe Computer
09.UNIXMini and Microcomputers
10.Xenix, VenixFor Mini and Micro like Unix
ऑपरेटिंग सिस्टिमचे प्रकार

हे सुद्धा वाचा