यूनिक्स ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय मराठी मध्ये | UNIX OPERATING SYSTEM IN MARATHI

यूनिक्स ऑपरेटिंग सिस्टम | UNIX OPERATING SYSTEM IN MARATHI

यूनिक्स ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय मराठी मध्ये | UNIX OPERATING SYSTEM IN MARATHI – संगणकाच्या क्षेत्रातील विज्ञान व्यक्तीच्या गप्पा चालू झाल्या की, ‘युनिक्स’ हे नाव हमखास घेतलं जातं.

प्रत्येकाला आपल्या संगणकासाठी युनिक्स असलीच पाहिजे असं वाटतं. अनभिज्ञ माणसाला वाटेल, की युनिक्स हे काहीतरी भलतंच अत्याधुनिक यंत्र असावं. पण तसा काही प्रकार नाही.

युनिक्स हे एका विशिष्ट ऑपरेटिंग सिस्टिमचं नाव आहे. संगणकाचे कार्य सुरळित चालविण्यासाठी प्रोग्रॅमचा एक संच संगणकामध्ये आधीच संग्रहित करण्यात येतो.

या संचालाच ऑपरेटिंग सिस्टिम असं म्हणतात. ‘पीसी डॉस‘, ‘एम्एस् डॉस’ वगैरे लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टिमना मागे सारून युनिक्स पुढे सरसाविण्याचा प्रयत्न करीत आहे.

यूनिक्स ऑपरेटिंग सिस्टम चा इतिहास

अमेरिकेतील बेल प्रयोगशाळेत खास छोट्या संगणकांसाठी १९७५ साली युनिक्स निर्माण करण्यात आली. संगणकाचे उत्पादन कोणत्याही कंपनीने केलेले असो, युनिक्स त्यांच्यावर सहजपणे ताबा मिळवू शकते.

युनिक्सचं हे एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इतर ऑपरेटिंग सिस्टिम विशिष्ट प्रकारच्याच संगणकासाठी उपयोगी पडतात.

साधारणपणे एका प्रकारच्या संगणकावर चालणारी ऑपरेटिंग सिस्टिम दुसऱ्या प्रकारच्या संगणकासाठी निरूपयोगी ठरते. युनिक्सचा एवढा एकच फायदा आहे असं नाही.

तिच्यामुळे एकच संगणक एकाच वेळी अनेकांना वापरता येतो. तसेच एका वेळेला अनेक प्रोग्रॅम्सची कार्यवाही तिच्यामुळे करता येते.

यूनिक्स ऑपरेटिंग सिस्टम ची वैशिष्ट्ये

मायक्रोपासून मेनफ्रेम पर्यंत कोणत्याही संगणकावर युनिक्स तेवढ्याच उच्च क्षमतेने काम करू शकते. संगणकाचा आत्मा म्हणजे मायक्रोप्रोसेसर !

तो सर्वच संगणकात सारखा नसतो. परंतु युनिक्सचे कार्य त्याच्यावर अवलंबून नसते आणि म्हणूनच ती कोणत्याही संगणकावर चालते.

संगणक वापरणारी व्यक्ती आपल्याला पाहिजे असलेल्या नवीन आज्ञा युनिक्समध्ये समाविष्ट करू शकते, हा आणखी एक तिचा विशेष गुणधर्म आहे.

हे सुद्धा वाचा