कंपायलर म्हणजे काय | COMPILER MEANING IN MARATHI

कंपायलर म्हणजे काय | COMPILER MEANING IN MARATHI

कंपायलर म्हणजे काय | COMPILER MEANING IN MARATHI आपण हाय लेव्हल लँग्वेजमध्येच आपला प्रोग्रॅम लिहितो. तो संगणकाला समजावा म्हणून त्याचे मशिन लँग्वेजमध्ये रूपांतर करावं लागतं.

ही क्रिया जो प्रोग्रॅम घडवून आणतो त्याला कंपायलर असं नाव आहे.

एक बेसिक भाषा सोडली तर इतर सर्व हाय लेव्हल लँग्वेजसाठी कंपायलरची आवश्यकता असते. परंतु एखाद्या विशिष्ट भाषेचा कंपायलर त्याच भाषेला चालतो.

तो दुसऱ्या कोणत्याही भाषेसाठी उपयोगी पडू शकत नाही. उदाहरणार्थ फोन या भाषेचा कंपायलर कोबोल, या भाषेच्या दृष्टीने निरूपयोगी आहे.

कंपायलरचा उपयोग | USE OF COMPILER IN MARATHI

ऑब्जेक्ट प्रोग्रॅम | OBJECT PROGRAM IN COMPILER IN MARATHI

आपण कोणत्याही हाय लेव्हल लँग्वेजमध्ये प्रोग्रॅम लिहिला की त्याला सोर्स प्रोग्रॅम असं म्हणतात, आणि त्याचंच मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर झालं की त्याला ऑब्जेक्ट प्रोग्रॅम असं नाव मिळतं.

संगणकाकडून ऑब्जेक्ट प्रोग्रॅमची अंमलबजावणी होण्याआधी, त्याची इतर ऑब्जेक्ट प्रोग्रॅमबरोबर सांगड घालावी लागते. हे प्रोग्रॅम, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला मूळ ऑब्जेक्ट प्रोग्रॅमवर प्रक्रिया करण्यासाठी लागतात.

कंपायलर म्हणजे काय | COMPILER MEANING IN MARATHI

उदाहरणार्थ बरेच संगणक दिलेल्या संख्येचे वर्गमूळ सरळपणे काढू शकत नाहीत. ही कृती करण्यासाठी ते एका छोट्या उपप्रोग्रॅमवर अवलंबून असतात.

हा प्रोग्रॅम ऑब्जेक्ट प्रोग्रॅमच्याच स्वरूपात म्हणजेच मशीन लँग्वेजमध्ये संगणकाच्या मेमरीत संग्रहित केलेला असतो.

जर मूळ ऑब्जेक्ट प्रोग्रॅममध्ये वर्गमूळ काढण्याची सूचना असली, तर ऑपरेटिंग सिस्टिम मूळ ऑब्जेक्ट प्रोग्रॅमबरोबर या वर्गमूळ काढणाऱ्या ऑब्जेक्ट प्रोग्रॅमशी सांगड घालून देईल.

एक्झिक्यूटेबल पॅकेज | EXECUTABLE PACKAGE IN COMPILER IN MARATHI

अशा प्रकारे विविध उपप्रोग्रॅमबरोबर सांगड घातलेल्या मूळ प्रोग्रॅमची अंमलबजावणी करू शकेल, असा जो नवीन प्रोग्रॅम तयार होतो त्याला ‘एक्झिक्यूटेबल पॅकेज’ असं नाव आहे.

लिंकेज एडिटिंग | LINKAGE EDITING IN COMPILER IN MARATHI

दोन प्रोग्रॅमची सांगड घालून देण्याच्या पद्धतीला ‘लिंकेज एडिटिंग’ म्हणतात. ‘एक्झिक्यूटेबल पॅकेजलाच ‘लोड मोड्यूल‘ असं ही नाव आहे.

या लोड मोड्यूलचीच संगणक अंमलबजावणी करतो. ऑब्जेक्ट प्रोग्रॅम आणि लोड मोड्यूल, फ्लॉपी डिस्कवर कायमचे संग्रहित करून ठेवता येतात.

मग त्या विशिष्ट सोर्स प्रोग्रॅमसाठी पुन्हा पुन्हा कंपायलेशन आणि लिंकेज करण्याची जरूर रहात नाही.

हे सुद्धा वाचा