युटिलिटी प्रोग्राम म्हणजे काय | WHAT IS AN UTILITY PROGRAM IN MARATHI

परिचय

युटिलिटी प्रोग्राम म्हणजे काय | WHAT IS AN UTILITY PROGRAM IN MARATHI – मॅग्नेटिक डिस्कवर डाटा संग्रहित करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच ते सर्वात लोकप्रिय साधन आहे.

परंतु मॅग्नॅटिक डिस्कवर किती डाटा संग्रहित करून ठेवता येईल यावर मर्यादा आहेत. विशेषतः मोठ्या संगणकाकडून संस्कारित केलेला सर्व डाटा त्यावर संग्रहित करता येत नाही, आणि अनेक वेळा त्याची जरूरीही नसते.

युटिलिटी प्रोग्राम म्हणजे काय | WHAT IS AN UTILITY PROGRAM IN MARATHI

नेहमी न लागणारा डाटा मॅगनॅटिक टेपवर संग्रहित केला तरी चालतो. पाहिजे त्यावेळी त्याचा उपयोग करता येतो.

अशा वेळी बरेच वेळा प्रथम तो तात्पुरता मॅगनॅटिक डिस्कवर संग्रहित करतात व त्यावर संगणकाने संस्कार केल्यावर पुन्हा डिस्कवरून तो टेपवर संग्रहित केला जातो.

अशा प्रकारची अदलाबदल नेहमीच करावी लागेल असं लक्षात आल्यावर निर्मात्यांनी त्याच्यासाठी प्रोग्राम निर्माण केले, आणि ते ऑपरेटिंग सिस्टिममध्येच समाविष्ट करून टाकले.

त्यामुळे विशिष्ट सूचनांच्या साह्याने टेपवरून डिस्कवर व पुन्हा डिस्कवरून टेपवर अशी डाटाची अदलाबदल एकदम सुलभ झाली.

या प्रोग्राममधील विशिष्ट सूचना, हवा असेल तो टेपवरील डाटा प्रथम डिस्कवर संग्रहित करते व संगणकाची डाटावरील प्रक्रिया संपली की दुसरी विशिष्ट सूचना, नेहमी नको असलेला डाटा डिस्कवरून टेपवर बदलते.

अशा प्रकारचे डाटाच्या अदलाबदलीचे काम करणाऱ्या प्रोग्रामचं नाव आहे ‘युटिलिटी प्रोग्राम’.

संगणकाबरोबरच त्यांचे निर्माते असे युटिलिटी प्रोग्राम ऑपरेटिंग सिसस्टिमच्या अंतर्गत समाविष्ट करून ते संगणक वापरणाऱ्यांना पुरवितात.

युटिलिटी प्रोग्रामचा उपयोग फक्त टेप आणि डिस्क यांच्यावरील डाटाची अदलाबदल करण्यासाठीच होतो असं नाही, तर एका टेपवरून दुसऱ्या टेपवर किंवा एका डिस्कवरून दुसऱ्या डिस्कवरही डाटाची अदलाबदल करता येते.

या शिवाय दोन प्रकारच्या डाटांचे एकत्रीकरण, अगर दिलेल्या डाटाची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी, अशा प्रकारचेही प्रोग्राम ‘युटिलीटी प्रोग्रामच्या’ सॉफ्टवेअर मध्ये समाविष्ट असतात.

सॉर्ट प्रोग्राम | SORT PROGRAM IN MARATHI

संगणकाच्या फाइल्स हाताळताना बरेच वेळा त्यामधील डाटा प्रथम चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावावा लागतो. मुद्दाम नवीन प्रोग्राम लिहून अशा प्रकारची क्रिया करणं जरा कटकटीचं काम असतं.

त्यासाठी युटिलिटी प्रोग्राममध्ये हाही एक प्रोग्राम समाविष्ट करण्यात येतो. त्याला ‘सॉर्ट प्रोग्राम’ असं नाव आहे. या प्रोग्राममुळे नुसती एक सूचना देऊन डाटा पाहिजे तसा लावता येतो.

सॉर्ट प्रोग्राम चे उदाहरण

मर्ज प्रोग्राम | MERGE PROGRAM IN MARATHI

तसंच अनेक वेळा दोन फाइलमधील डाटा एकत्र करून त्याची एक नवीन फाइल तयार करतात. या प्रोग्रामला ‘मर्ज प्रोग्राम’ असं म्हणतात.

दोन फाइल्सची नावं आणि विशिष्ट सूचना दिल्या, की या प्रोग्राममुळे दोन फाइल्समधील डाटा आपोआप एकत्र होतो.

मर्ज प्रोग्राम चे उदाहरण

हे सुद्धा वाचा