फाईल म्हणजे काय | WHAT IS A FILE IN COMPUTER IN MARATHI

परिचय

फाईल म्हणजे काय | WHAT IS A FILE IN COMPUTER IN MARATHI – फाईल हा शब्द उच्चारला की तुमच्या डोळ्यासमोर ऑफिसात वापरतात तशी लांब रूंद पुठ्याची फाईल डोळ्यासमोर येण्याची शक्यता आहे.

परंतु संगणकाच्या भाषेत मात्र फाईल या शब्दाचा अर्थ अगदीच निराळा आहे. ऑफिसमधील फाईल्समध्ये निरनिराळ्या प्रकारचे अनेक कागद कोंबलेले आपल्याला आढळतात.

कॉलेजमधील विषयांच्या नोटस् एकत्र ठेवायलाही कधी कधी फाईल्सचा वापर केला जातो. संगणकाच्या भाषेतील फाईल अशा प्रकारची नसते. ती कधीच जाड पुठ्यांमध्ये बंदिस्त केली जात नाही.

संगणकाची फाईल नेहमी फ्लॉपी डिस्कवर किंवा हार्ड डिस्कवर असते. संगणकाच्या कोणत्याही फाईलला विशिष्ट नाव द्यावंच लागत.

संगणक त्या नावावरूनच अनेक फाईलमधून विशिष्ट फाईल ओळखून काढतो. कारण एका फ्लॉपीवर किंवा हार्डडिस्कवर अनेक फाईल्स असू शकतात.

फाईल म्हणजे काय | WHAT IS A FILE IN COMPUTER IN MARATHI

विशिष्ट प्रकाराने सुसंगतपणे लावलेली अनेक रेकॉर्डस् किंवा नोंदी, अशी संगणकासाठी फाईलची व्याख्या आहे.

अशा व्यवस्थित लावलेल्या फाईलमधील विशिष्ट रेकॉर्ड आपल्यास पाहिजे असेल, तर संगणक ते चटकन शोधून काढू शकतो.

त्यामुळे परीणामकारक उपयोगसाठी कोणत्याही फाईलमधील रेकॉर्डस् सुसंगतपणे लावावीच लागतात. ज्यावेळी एकाच प्रकारची माहिती असलेली अनेक रेकॉर्डस् असतात, असा वेळी फाईलचा अत्यंत उपयोग होतो.

उदाहरणार्थ नाव, पत्ता, शहर, राज्य, झिप्कोड, अशी माहिती असलेली हजारो नावे असतील, तर ती हाताळण्यासाठी फाईल सारखं दुसरं साधन नाही.

या पत्त्यांच्या फाईलमध्ये ही सर्व माहिती संगतवार लावलेली असते. समजा त्यामधील भोसले या आडनावाची विशिष्ट व्यक्ती पाहिजे असेल, तर त्या हजारो नावांमधून क्षणार्धात तुम्हाला या व्यक्तीचा पत्ता मिळू शकेल.

फाइलची कार्ये

संगणकामध्ये व्यवहारात वापरतात तशी फाईल नसली, तर ज्या क्रिया नेहमीच्या फाईलसाठी कराव्या लगातात, तशाच सर्व क्रिया संगणकाच्याही फाईलसाठी करतात.

कोणत्या फाईलमध्ये काय आहे ते पहाण्यासाठी ती प्रथम उघडावी लागते. त्यानंतर त्यामधील माहिती आपण वाचतो, किंवा काही नवीन माहिती त्यात लिहितो, अगर आधी असलेल्या माहितीत आपण सुधारणा करतो.

हे सर्व झालं, की फाईल बंद करून ती ठेवून देतो. संगणकाच्या फाईलसाठी अगदी असंच करावं लागतं.

त्यासाठी ओपन, रीड, राइट्, अॅपेन्ड, क्लोज, म्हणजेच उघड, वाच, लिही, पुरवणी जोड, बंद कर, अशा प्रकारच्या सूचना प्रोग्रॅममध्ये लिहाव्या लागतात.

फाइल्सचे भाग

समजा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आपल्याला फाईल तयार करायची आहे. तर प्रथम शीर्षके निश्चित करावी लागतील.

उदाहरणार्थ नाव, पत्ता, वर्ग, तुकडी, विषय, अशा प्रकारची आपली शीर्षके असतील. या शीर्षकांना ‘फिल्ड’ असं नाव आहे. या सर्व शीर्षकांच्या खाली असलेली एकत्र माहिती म्हणजेच विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड !

आणि अशी अनेक विद्यार्थ्यांची रेकॉर्डस् म्हणजे फाईल ! फक्त सर्व रेकॉर्डस् सुसंगत लावलेली असली पाहिजेत. संगणकाच्या फाईलची अशी ही चढती भाजणी आहे.

फायलीचे प्रकार

सिक्वेन्शिअल फाईल

फाईल्सचे साधारणपणे दोन प्रकार केले जातात. एका प्रकारात सर्व रेकॉर्डस् ओळीने एका पुढे एक चढत्या क्रमाने लावलेली असतात.

या प्रकाराला ‘सिक्वेन्शिअल फाईल’ असं नाव आहे. सिक्वेन्शिअल फाईलमधील एखादं विशिष्ट रेकॉड पाहिजे असेल, तर त्या रेकॉर्ड पर्यंत पोहोचण्यासाठी संगणकालाही क्रमाने प्रत्येक रेकॉर्ड तपासत जावं लागतं.

रॅन्डम फाईल

दुसऱ्या प्रकारात रेकॉर्डस्ना कोणताही विशिष्ट क्रम नसतो. या प्रकाराला ‘रॅन्डम फाईल’ असं म्हणतात. या प्रकारात आपण विशिष्ट रेकॉर्डपर्यंत चटकन् पोहोचू शकतो.

अर्थातच रॅन्डम फाईल्स सिक्वेन्शिअल फाईल्स पेक्षा जलद गतीने हाताळता येतात.

हे सुद्धा वाचा