संगणकामध्ये मेनू म्हणजे काय | WHAT IS COMPUTER MENU IN MARATHI

परिचय

संगणकामध्ये मेनू म्हणजे काय | WHAT IS COMPUTER MENU IN MARATHI – आज जेवणाचा मेनू काय आहे? असा शब्दप्रयोग आपण अनेक वेळा वापरतो. किंवा एखाद्या हॉटेलात गेलो तर वेटरला मेनूकार्ड देण्याची आपण विनंती करतो.

या दोन उदाहरणात मेनू या शब्दाचा जो अर्थ होतो, तशाच काहीशा अर्थाने हा शब्द संगणकासाठीही उपयोगात आणतात. वरील उदाहरणात मेनू याचा अर्थ निरनिराळे खाद्य पदार्थ असा आहे.

संगणकासाठी मेनू या शब्दाचा अर्थ होते निरनिराळे प्रोग्रॅम ! हॉटेलातील वेटरप्रमाणेच हे विविध प्रोग्रॅमचे मेनूकार्ड संगणक आपल्याला देऊ शकतो.

संगणकामध्ये मेनू म्हणजे काय | WHAT IS COMPUTER MENU IN MARATHI

एकाच फ्लॉपीवर अनेक प्रोग्रॅम संग्रहित करून ठेवता येतात, पण त्या सर्वांची नावं आपल्या लक्षात रहाणं कठीण असतं. डॉसमधील एका विशिष्ट सूचनेने त्या सर्वांची नावं मॉनिटरच्या दर्शक पडद्यावर पहाता येतात.

परंतु त्यांची कार्यवाही मात्र करता येत नाही. कारण प्रोग्रॅम बेसिक किंवा अन्य कोणत्याही भाषेत लिहिलेला असला तरी डॉस त्याची कार्यवाही करू शकत नाही.

डिस्क ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजेच डॉस्, संगणकाचा कारभार फक्त उत्कृष्ट पद्धतीने चालवू शकते. त्यामुळे फ्लापीवर जे जे प्रोग्रॅम संग्रहित केलेले असतात त्यांचा एक मेनू प्रोग्रॅम तयार करण्यात येतो.

संगणकाला हा प्रोग्रॅमचा मेनू मागता येतो. त्या बरोबर ताबडतोब फ्लॉपीवर कोण कोणते प्रोग्रॅम आहेत ते मॉनिटरच्या पडद्यावर आपल्याला पहायला मिळते.

प्रत्येक प्रोग्रॅमच्या मागे बहुधा त्याचा क्रमांक लिहिलेला असतो. कोणत्याही उच्च पातळीच्या भाषेत हा मेनू प्रोग्रॅम तयार करता येतो.

मेनूचे कार्य

मेनू मधील जो विशिष्ट प्रोग्रॅम आपल्याला हवा असेल, त्याचा क्रमांक संगणकाला दिला की काम संपलं.

फ्लापीवरील बाकीचे सर्व प्रोग्रॅम बाजूला सारून, आपण सांगितलेल्या प्रोग्रॅमची कार्यवाही संगणक सुरू करतो, आणि आपल्याला हवी असलेली उत्तरे ताबडतोब मिळू शकतात.

अनेक प्रोग्रॅममधून आपल्याला हव्या असलेल्या प्रोग्रॅमची निवड आणि त्याची ताबडतोब कार्यवाही हाच संगणकाच्या मेनूचा विशेष आहे.

हे सुद्धा वाचा