सॉफ्टवेअर या शद्धाचा अर्थ काय | सॉफ्टवेअर म्हणजे काय | WHAT IS SOFTWARE IN MARATHI

सॉफ्टवेअर या शद्धाचा अर्थ काय | सॉफ्टवेअर म्हणजे काय | WHAT IS SOFTWARE IN MARATHI

व्याख्या

सॉफ्टवेअर या शद्धाचा अर्थ काय | सॉफ्टवेअर म्हणजे काय | WHAT IS SOFTWARE IN MARATHI – सॉफ्टवेअर म्हणजे विविध प्रकारचे प्रोग्रॅम्स !

आपल्या मनातील विचार ज्याप्रमाणे आपल्या शरीराला चालायला किंवा बोलायला लावतात, त्या प्रमाणे प्रोग्रॅम संगणकाला एखादी विशिष्ट गोष्ट योजनापूर्वक करायला लावतो.

सॉफ्टवेअरचे प्रकार

सॉफ्टवेअरचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. एकाचं नाव ‘अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर’ आणि दुसऱ्याचं ‘सिस्टम सॉफ्टवेअर’ !

अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय

कर्जावरील व्याज, बँकेमधील शिल्लक, बिलांची आकारणी, रेल्वे किंवा विमानाचे रिझर्वेशन, रोगाचं निदान, खेळ, अशा प्रकारच्या विविध गोष्टींसाठी जे प्रोग्रॅम लिहिले जातात त्याला ‘अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर’ असं नाव आहे.

एखादी विशिष्ट गोष्ट संगणकाकडून आपल्याला करवून घ्यायची असते. ती गोष्ट संगणकाकडून प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी अर्थातच विशिष्ट प्रोग्रॅम आपल्याला लागेल.

उदाहरणार्थ

रोग्याच्या लक्षणांवरून समजा रोगाचं निदान करायचे असेल, तर त्यासाठी लिहिलेला प्रोग्रॅमच उपयोगी पडेल.

याच प्रोग्रॅमचा उपयोग करून रोगांच निदान करणं संगणकाला शक्य होईल. असे त्या त्या विशिष्ट कामासाठी लिहिलेले सर्व प्रकारचे प्रोग्रॅम, अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर या नावाने ओळखले जातील.

विविध प्रकारचे हजारो अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रोग्रॅम बाजारात उपलब्ध असतातच, शिवाय आपल्याला पाहिजे त्या प्रकारचे अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर आपण लिहू शकतो.

सिस्टम सॉफ्टवेअर

अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरची नीट अंमलबजावणी होण्यासाठी काही प्रोग्रॅम संगणकाच्या मेमरीमध्ये आधीच असावे लागतात. अशा प्रोग्रॅम्सना सिस्टिम सॉफ्टवेअर असं म्हणतात.

ऑपरेटिंग सिस्टम हा सिस्टम सॉफ्टवेअरचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. संगणकाचे सर्व कार्य तोच नियंत्रित करतो. निराळ्या शब्दात असं म्हणता येईल की संगणकाचे हार्डवेअर आणि अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर यांना जोडणारा दुवा म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर !

हे सुद्धा वाचा