आधुनिक संगणकाचा शोध कुणी लावला ? WHO INVENTED COMPUTER IN MARATHI

आधुनिक संगणकाचा शोध कुणी लावला ? WHO INVENTED COMPUTER IN MARATHI

आधुनिक संगणकाचा शोध कुणी लावला ? WHO INVENTED COMPUTER IN MARATHI – आधुनिक संगणकाच्या शोधाचे श्रेय कुणा एका व्यक्तीला देता येणार नाही. कित्येक व्यक्तीचा त्याला हातभार लागला आहे.

१९३७ पासून १९४६ पर्यंत या काळात सुधारणा होत होत, खऱ्या अर्थाने आधुनिक संगणक १९४६ साली सिद्ध झाला.

अॅटॅनासोफ् बेरी कॉम्प्युट – ATANASOFF-BERRY COMPUTER

आधुनिक संगणकाचा शोध कुणी लावला ? WHO INVENTED COMPUTER IN MARATHI
अॅटॅनासोफ् बेरी कॉम्प्युट

१९३७-३८ या वर्षात पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक निर्माण झाला असं म्हणता येईल. त्याचं असं झालं ! अमेरिकेतील आयोवा स्टेट कॉलेजमध्ये डॉ. जॉन व्हिन्सेंट अॅटॅनासोफ्, हे पदार्थविज्ञान आणि गणित या विषयाचे प्राध्यापक होते.

संशोधनासाठी त्यांना अनेकवर्णी समीकरणे सोडवावी लागत. त्याही काळात, काही यंत्रांच्या साह्याने बेरजा वजाबाक्या करता येत असत.

परंतु डॉ. अॅटॅनासोफ् यांच्या दृष्टीने ती सर्व यंत्रे अगदीच टाकाऊ होती. त्या यंत्रांच्या साह्याने लाबलचक समीकरणांची उत्तरे मिळविणं हे जिकीरीचं काम होतं, तेव्हा आपण स्वतःच एक संगणक तयार करायचा, असे डॉ. अॅटेनासोफ् यांनी ठरविलं.

त्यासाठी त्यांनी क्लिफोर्ड बेरी या आपल्या विद्यार्थ्याला हाताशी धरलं. आणि एका वर्षातच, म्हणजे १९३८ साली त्यांनी पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक बांधला.

अॅटॅनासोफ् यांनी त्याचं नाव ठेवलं ‘एबीसी’ म्हणजे ‘अॅटॅनासोफ् बेरी कॉम्प्युटर या संगणकात त्यांनी ३०० निर्वात नलिकांचा उपयोग केला होता.

हा संगणक २९ वर्षापर्यंतची समीकरणं सोडवू शकत असे. परंतु या एका कामापेक्षा त्याला दुसरे काहीच करता येत नसे.

मार्क १ संगणक – MARK 1 COMPUTER

त्याच्या पुढल्याच वर्षी म्हणजे १९३९ साली, हावर्ड विद्यापिठाच्या होवार्ड आयकेन यांनीही संगणक बांधायला सुरूवात केली, पण त्यांचा संगणक पूर्ण व्हायला १९४४ साल उजाडलं.

त्यांनी आपल्या संगणकाच नाव ठेवलं ‘मार्क १. त्यामध्ये दशमान पद्धती ऐवजी द्विमान पद्धतीचा वापर प्रथमच करण्यात आला होता. मार्क १ हा संगणक भलताच अवाढव्य होता.

त्यामध्ये ८०० किलोमीटर लांबीच्या तांब्याच्या तारा तर होत्याच; पण जवळ जवळ ३० दशलक्ष विद्युत् कनेक्शन्स होती.

गुंतागुंतीचा गुणाकार करायला ‘मार्क १’, संगणकाला किमान ६ सेकंद लागत, तर भागाकार करायला तो १२ सेकंदाचा वेळ घेई.

अर्थातच मार्क १ निर्माण होत असतांनाच कालबाह्य झाला आणि लवकरच तो मोडीत निघाला.

एनिऐक – ENIAC COMPUTER

आधुनिक संगणकाचा शोध कुणी लावला ? WHO INVENTED COMPUTER IN MARATHI

मध्यंतरीच्या काळात दुसरं महायुद्ध चालू झालं, आणि सैन्याला अचूक गणित करणाऱ्या यंत्रांची तीव्र निकड भासू लागली.

विशेषतः छोट्या मोठ्या तोफा, मशिनगन्स यांची अचूक मारगिरी करण्यासाठी, अंतर, कोन, गती यांच्या अनेक कोष्टकांची अतिशय आवश्यकता होती.

त्यासाठी असंख्य सूत्रे सोडवावी लागत. सैन्याची ही अडचण लक्षात आल्यावर १९४३ साली प्रेस्पेर एक्केर्ट आणि जॉन माउश्ले, यांनी त्यांच्यासाठी संगणकाची एक योजना तयार केली.

अमेरिकन सेनेने ताबडतोब या योजनेला उचलून धरलं आणि त्यासाठी लागेल तेवढा पैसा खर्च करण्याची तयारी दर्शविली. त्यातूनच खऱ्या अर्थाने आधुनिक संगणकाचा जन्म झाला.

एक्केर्ट आणि माउश्ले यांचा संगणक मात्र युद्ध संपल्यानंतर म्हणजे १९४६ साली सिद्ध झाला. त्याचे नाव ठेवण्यात आलं ‘एनिऐक’ !

हे सुद्धा वाचा –